फोडणी!

मराठीचा झुणका, मराठीची भाकरी, मराठीचे दिवस, मराठीच्या रात्री, मराठीतंच उचकी, मराठीतंच ठसका, मराठी न्हाय वाटत? काय भाऊ, बास का! मराठमोळं प्रेम, मराठमोळ्या शिव्या (काय त्यांची लीला, त्या मराठीच हव्या!) मराठी अंगाई, मराठी भुपाळी, मराठीतच कटकट सकाळी सकाळी! अटकेपार झेंडा, संतांची वाणी, मराठी मनांची नवीन गाणी! सुगम, नाट्य, पोवाडा, लावणी, मराठी स्वरांना मराठी फोडणी! – एप्रिल… Continue reading फोडणी!

चिट्ठी

कपाटाच्या कोपऱ्यात एक चिट्ठी पडली आहे.   धूळ झटकून फडकं जरा कंटाळलेलं आहे, पसाऱ्याच्या हट्टानं वैतागून गेलं आहे. कपाटाच्या दाराची किरकिर चालूच असता कितीही झटकलं तरी, कपाट मळलेलंच आहे.   अशातंच ती चिट्ठी सापडते.   गोऱ्या कागदाला दॄ़ष्ट लागू नये म्हणून शाईचा एक ठिपका आहे. कुबट वासाचा, आळसावलेल्या काळाचा एक वेगळाच भपका आहे.   जिर्ण… Continue reading चिट्ठी

माझी माय मराठी

माझ्या माय मराठीच्या पदराची मला ओढ ǀ कशा शब्दांत सांगावं माझी माय किती गोड ǀǀ लोभसवाणं तिचं रूप कांती सुर्याची हळद ǀ तिच्या बांगडीचा ठेका किती हळवा सुखद ǀǀ तिस शोभे नाकी नथ वेणीमध्ये रानफूल ǀ तिच्या लेकी पेशवाई आणि बहिणेची चूल ǀǀ किती सुंदर संपन्न माझ्या मायेचा संसार ǀ तिचा वारसा समॄध्द सह्याद्री ते… Continue reading माझी माय मराठी