चिट्ठी

कपाटाच्या कोपऱ्यात एक चिट्ठी पडली आहे.

 

धूळ झटकून फडकं जरा कंटाळलेलं आहे,

पसाऱ्याच्या हट्टानं वैतागून गेलं आहे.

कपाटाच्या दाराची किरकिर चालूच असता

कितीही झटकलं तरी, कपाट मळलेलंच आहे.

 

अशातंच ती चिट्ठी सापडते.

 

गोऱ्या कागदाला दॄ़ष्ट लागू नये म्हणून

शाईचा एक ठिपका आहे.

कुबट वासाचा, आळसावलेल्या काळाचा

एक वेगळाच भपका आहे.

 

जिर्ण शब्द प्रतिक्षेत आहेत,

त्यांना कोणीतरी वाचावं या अपेक्षेपायी

वाचणारा वाचेल,

पण लिहीणारा कुठेय? त्याचा काही पत्ताच नाही.

 

भूतलावर स्वतःची खूण ठेवण्याच्या प्रयत्नास

कुजलेल्या कपाटातील एक कोपरा मिळावा

हे दुर्दैव समजावं,

की अनंतकाळात विलीन होऊन सुद्धा

कोणाला तरी आपली खूण मिळावी

हे सुदैव म्हणावं ?

 

…चिट्ठीतले शब्द दिसत नाहीयेत.

 

डोळ्यात इतक्या आठवणींची गर्दी होत्ये

की आश्रूंना सुध्दा जागा नाही.

सोकावलेल्या काळाला आवर घालणार कोण ?

त्याला सांभाळून घेतलं तर निदान त्रागा नाही.

 

…कागद पिवळा होतोय; कपाटात नको, सोबत ठेवावा.

कोण जाणे, उद्या आपला मजकुर कोणाला तरी जपावासा वाटावा.

 

कपाट स्वच्छ झालंय.

 

ऒक्टोबर २०१२

Advertisements

4 thoughts on “चिट्ठी

  1. Freeform मधली अप्रतिम कविता. Incidently freeform असून ह्याचं वाचन खूप सोपय , आणि त्याला एक intrinsic लय आहे. गद्याला कधी-कधी असते तशी. जर तुला चालणार असेल तर मी ह्याच वाचन करू? As a pervious example, I do stuff like this with Kavita. http://www.youtube.com/watch?v=LD4-WjJdG_4

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s