माझी माय मराठी

माझ्या माय मराठीच्या

पदराची मला ओढ ǀ

कशा शब्दांत सांगावं

माझी माय किती गोड ǀǀ

लोभसवाणं तिचं रूप

कांती सुर्याची हळद ǀ

तिच्या बांगडीचा ठेका

किती हळवा सुखद ǀǀ

तिस शोभे नाकी नथ

वेणीमध्ये रानफूल ǀ

तिच्या लेकी पेशवाई

आणि बहिणेची चूल ǀǀ

किती सुंदर संपन्न

माझ्या मायेचा संसार ǀ

तिचा वारसा समॄध्द

सह्याद्री ते अटकेपार ǀǀ

परि साधी माझी माय

तिस घराचा सुगंध ǀ

तिच्या कुशीत सापडे

मला सोवळा आनंद ǀǀ

ऒक्टोबर २०१२

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s