वळण…

चालता चालता चालत आले थेट तुझ्या दारी.

विचार कसला? प्रीत जडली, भावली मजला स्वारी.

तरी मध्ये ठेच लागून पाय अडखळला होता,

बहुतेक माझा खरा रस्ता मागेच वळला होता…

 

डोक्यावरती वादळ वारा, पाठीवरती ऊन.

तुझी आस धरली आणि फेडले कित्येक ऋण

तरी एखादा आश्रू मी परका गाळला होता,

बहुतेक माझा खरा रस्ता मागेच वळला होता…

 

तुझ्याकडे आपसुक आले, यात वावगं, वैर नाही.

कोपऱ्यातलं मन कोपऱ्यात जपलं, यात ही गैर नाही.

तुला सुध्दा वळणावरचा तडा कळला होता

बहुतेक माझा खरा रस्ता मागेच वळला होता…

Image

 

 

– जून २०१३

Advertisements

One thought on “वळण…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s