एक पर्व… मारूतीचं!

१८ जानेवारी २०१४ ला शेवटची मारूती ८०० गुड़गाव मध्ये तयार झाली, आणि भारतीय मध्यम वर्गीयांच्या आयुष्यातलं एक पर्व संपलं…

 

एक पर्व पारावरच्या स्वप्नांना पेलणारं
स्वप्नांमधल्या आभाळाला खांद्यांवर झेलणारं
एक पर्व सामान्यांच्या ऊंच भरारीचं,
चालत्याला धावतं करणाऱ्या आमच्या मारूतीचं!

घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब लागू लागला
अंगणात दिलेल्या शब्दाला वारा सुध्दा जागला
रांगोळीच्या सोबतीस भाग्य तबकातल्या आरतीचं
घरात नवीन पाहुणी आली, स्वागत मारूतीचं!

पोरं जमली, प्रत्येकाला फिरून येयची घाई
गजरा घालून चटकन आल्या काकू, आजी, आई.
बाबा अजोबा हसले, म्हणाले; “काय रे नाव हिचं?”
आठशे वेळा ओवाळल्यागत कौतुक मारूतीचं!

पहिला पगार, पहिलं प्रेम, सारं तिनं पाहिलं
संसाराच्या सुखाचं मन तिच्याचकडे राहिलं
तिच्या पाठी कित्येक आल्या, रूप बदललं प्रगतीचं
मनाच्या कोपऱ्यात मात्र कायम एक स्थान मारूतीचं!

 – फेब्रुवारी २०१४

Advertisements

5 thoughts on “एक पर्व… मारूतीचं!

  1. Aai Shappth! Never thought anyone would write a poem about an 800. And that too, so beautiful.
    आठशे वेळा ओवाळल्यागत कौतुक मारूतीचं!…haha kamaal !!! jamlay !!

    Like

  2. अगदी खरं . कधी कधी वाटतं की आज काल नव्याची म्हणावी तेवढी नवलाई राहिली नाही. किंवा सर्वांमध्ये आनंद वाटण्यासाठी वेळ आणि इच्छा दोन्ही उरलेले नाही.

    पण केवळ उपयुक्ततेच्या पलीकडे काही गोष्टी असतात ह्याची जाणीव करून देणारी ही कविता आवडली. मराठी मध्ये सुद्धा उत्कृष्ट कसब आहे तुझं. लिहित राहावे, वाचनाचा आनंद आम्ही घेत आहोतच 🙂

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s