गुलमोहर

आजतोवर माळरानावर बहरणाऱ्या गुलमोहराला विसरून गेलाय हा उन्हाळा.   हिरव्या सावल्या, लालसर बाहुल्या, फांदीवरच्या कोकिळेला हरवून बसलाय हा उन्हाळा.   एकली वाट, झाकली मूठ, वास्तवाशी ताटातूट सव्वा लाख स्पंदनांना एका क्षणभराची सूट   निळसर चाहुल, तिरकं पाऊल रेखाटणाऱ्या आभाळाला खोडून गेलाय हा उन्हाळा.   दव खेळणाऱ्या, ऊन झेलणाऱ्या गवताच्या हिरव्या पात्याला सुकवून गेलाय हा उन्हाळा.… Continue reading गुलमोहर