गुलमोहर

आजतोवर माळरानावर बहरणाऱ्या गुलमोहराला

विसरून गेलाय हा उन्हाळा.

 

हिरव्या सावल्या, लालसर बाहुल्या, फांदीवरच्या कोकिळेला

हरवून बसलाय हा उन्हाळा.

 

एकली वाट, झाकली मूठ, वास्तवाशी ताटातूट

सव्वा लाख स्पंदनांना एका क्षणभराची सूट

 

निळसर चाहुल, तिरकं पाऊल रेखाटणाऱ्या आभाळाला

खोडून गेलाय हा उन्हाळा.

 

दव खेळणाऱ्या, ऊन झेलणाऱ्या गवताच्या हिरव्या पात्याला

सुकवून गेलाय हा उन्हाळा.

 

पहिली सर, रंगांवर, उदार झाला गुलमोहर

सांडते मेघ, धावती रेघ- घसरून, घाबरून झाडावर!

 

गुलमोहरांस, नवीन श्वास, देऊ करणाऱ्या पावसाळ्याला

शमवून गेलाय हा उन्हाळा.

source: flickr.com

 

एप्रिल २०१४

Advertisements

One thought on “गुलमोहर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s