सप्तपदी – दुसरं पाऊल – समाज ओलांडताना. The Seven Steps – Second Step – Crossing over Society.

भारतीय समाजाचा दुटप्पीपणा पहायचा असेल तर भारतीय लग्नं बघावीत.

एरवी पै अन पै जपणारी लोकं अचानक एका दिवसात लाखो रूपये कसे काय उधळतात हे मला न सुटलेलं कोडं आहे. आयुष्यातली पहिली २०-२५ वर्षं मुला-मुलींना एकमेकांपासून लांब ठेवून अचानक त्यांना उरलेलं आयुष्य एकत्र रहायला लावतात काय, प्रेम आणि शारीरिक जवळीक ही स्त्री-पुरूष नात्यातली “शेवटची पायरी” कशी याचे गोडवे गायचे काय, आणि लग्न मात्र काही महिन्यांच्या ओळखीत आणि भेटीत बिंदास लावून द्येयचं काय. “लग्नाचा बाजार”, “मुलगी देणे”, आणि तत्स्म “विचार” आणि “पध्दती” केवळ पूर्वीपासून चालून आले आहेत म्हणून आपण पुढे ढकलायचे, हे भारतीय समाजाने अगदी मनापासून ठरवलंय. जी मुलं नंदी बैलासारखी मान हलवून ते पुढे ढकलायची तयारी दाखवतात, त्यांना हा समाज अर्थात डोक्यावर बसवतो. आमच्यासारखे मात्र झगडत राहतात…

समाजाला काही शिकवायला किंवा काही सामाजिक चळवळ चालू करायला मी काही मोठी व्यक्ती नाही. केवळ माझं लग्न माझ्या मनाप्रमाणे व्हावं हा आग्रह. पैश्यांची नासाडी, नसत्या साड्यांवर भरमसाठ खर्च, अनोळखी पाहुण्यांची झुंड, तीच ती कार्यालयं आणि तीच ती जेवणं, फाल्तूचे रुसवे-फुगवे, मान-पान… या कशाला कोठेच अंत नाही.

तो अंत मला माझ्या लग्नात हवा होता. इथेच वाद सुरू झाले. घरच्यांना भयंकर काळजी – मुलीचे असे विचार! मुलाचे असे विचार असले की तो पुरोगामी असतो; मुलीचे असे विचार असले की ती चिंतादायक असते. मुलाचे असे विचार सासरी गर्वाने सांगितले जातात आणि मुलगी नशीबवान समजली जाते; मुलीचे असे विचार सासरी सहसा सांगायची गरज पडू नये, याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. उलट, तिला एक शंभर वेळा तरी “सासरचे काय म्हणतील!” ऐकवलं जातं. परीस्थिती इतकी टोकाची नव्हती, पण माझ्या घरी अमोघच्या पुरोगामी विचार असल्याबद्दल जितकं कौतूक होतं, तितकीच माझे तेच विचार असल्याबद्दल चिंता पण होती. काहीही कॄती करायची पद्धत रोकठोक आणि स्पष्टपणे सांगून असल्यामुळे माझी प्रतिमा आक्रमक आणि त्यामुळे जरा त्रासदायकच आहे. भारतीय समाजात आक्रमकता फक्त पुरूषांमध्ये ’गूण’ आहे; स्त्री कशी, कायम शांत, सोजवळ, सांगितलेलं ऐकणारी आणि पडती बाजू घेणारी असली पाहिजे!

…आम्हा दोघांचे आपापल्या घरच्यांशी भरपूर वाद झाले. इतके वर्षं आम्हाला कायम विचार करायला, प्रश्न विचारायला, आणि स्वतःच्या विचारांशी ठाम रहायला शिकवणारी ही समंजस, सुशिक्षित, हुशार मंडळी, आज आम्हाला बरोबर उलटं करायला सांगत होती. आम्ही दोघं अवाक झालो, मग चिडलो, आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर आम्हाला कळलं – हे वाद समाजाच्या विचारसरणीशी होत आहेत.

भांडून शेवटी घरचे आमच्या पाठीशी उभे राहिले, अगदी खंबीरपणे. समाज अजून तसाच आहे.

१० मार्च २०१५


If you ever want to see Indian hypocrisy, go attend an Indian wedding.

What baffles me is how those who save to the last penny can bring themselves to spend millions in one single day. For the first 20-25 years of their lives, girls and boys are fastidiously kept away from each other, and one fine day are expected to know and live with each other for the rest of their lives. Love and its physical expression are famously upheld as the “final steps” of the relationship between a man and a woman, but a few months’ acquaintance is considered more than enough for a marriage. The Indian society has sincerely decided that “Marriage market”, “giving away the girl”, and other similar “thoughts” and “customs” are meant to be handed over to the next generation simply because they have arrived through tradition. Those who play the puppet in promoting these ‘values’ are lauded. The ones like us, however, keep struggling…

I am nobody of stature to preach to the society or start a social revolution. All I insisted for was that my wedding should take place as I wanted it to. Wastage of money, excessive spending on unnecessary sarees, waves of unknown guests, the same wedding halls and the same wedding meals, stupid ego issues, and arbitrary and exaggerated honours… there is no end to this. I wanted that end in my wedding. This is where the arguments started. My family was extremely worried – this is how the girl thinks! A boy with such rebellious thoughts is progressive; a girl with the same thoughts is worrisome. The boy is praised at his in-laws and the girl is considered lucky; it is hoped that the girl’s in-laws do not hear of her thoughts. In fact, she frequently gets to hear the horror phrase: “what will your in-laws say!” The situation in my family was not that extreme, but as much as Amogh’s progressive thoughts were met with appreciation, mine were met with concern. Being naturally straight forward and blunt about everything, my image is rather aggressive, and consequently, troublesome. In the Indian society, aggressiveness is a ‘male’ virtue; the woman is always supposed to be quiet, calm, a paradigm of purity, obedient and willing to compromise.

… Each of us argued a lot with our respective families. For all these years, these mature, educated, intelligent folks taught us to think, to question, and to stand firmly for our thoughts, and yet now, they were asking us to do exactly the opposite. Both of us were shocked, then angry, and then, at a certain point of time, we realized – our conflict was not with our families; it was with the society.

After all the arguments, our families stood by us like a solid rock. Society remains unchanged.

10 March 2015

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s