सप्तपदी – तिसरं पाऊल – बोलावण्या! The Seven Steps – Third Step – Invitations!

अमेरिकेत एकदा मला एकानं विचारलं होतं, “तुमच्या लग्नांमध्ये इतकी लोकं का असतात? तुमची लग्नं इतकी लांबलचक आणि क्लिष्ट का असतात?” यावर माझ्यातल्या 17 वर्षीय देशप्रेमी विद्यार्थिनीने तडक उत्तर दिलेलं: “कारण आमच्याकडे लग्न दोन लोकांचं नाही, दोन कुटुंबांचं होतं.”

… 7 वर्षांनंतर हेच उत्तर माझ्यावर उलटलं.

‘लग्न आमच्या दोघांचं आहे, त्यामुळे लग्नाला येणारी मंडळी पण आम्ही ठरवणार’ हे आमचं म्हणणं आमच्या दृष्टीने अगदी योग्य आणि घरच्यांच्या दृष्टीने अतिशय अयोग्य होतं. अर्थात, जवळचे नातेवाईक बोलवायला दोघांची ना नव्हती. आमचा आक्षेप होता आजु-बाजूच्या अनोळखी मंडळीवर. आधीच आंजर्ले छोटं, त्यात लांब. तिथे फार तर फार दोन्ही बाजू मिळून 200 लोकं मावणार. अशा मध्ये आमच्या ओळखीच्या, आणि आम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य नको का? हा माझा आणि आमोघचा सोपा प्रश्न होता.

घरच्यांचं म्हणणं वेगळं होतं. इतके वर्षं नाते-संबंध निर्माण केले आणि जपले होते…त्यांना न बोलवून कसं चालेल? आणि त्यांच्या पोरा-बाळांच्या लग्नांना त्यांनी आमंत्रण दिलं ना! आहेर पण केला! मग त्यांना न बोलवून कसं चालेल? माझं आणि आमोघचं स्पष्ट मत होतं… आम्ही त्यांच्या जागी असतो तर आम्हाला कोणा ओळखीच्यांच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण नसलेलं चाललं असतं. पण सगळेच असा विचार करत नाहीत, किंबहुना बरेचसे लोकं असा विचार करत नाहीत हे आम्हाला माहीत होतं.

पाहुण्यांच्या यादीवरुन बरीच ओढाताण झाली. शेवटी ठिकाणाची मर्यादा मात्र आमच्या मदतीला धावून आली, आणि आम्हाला माहीत असलेले, मनापासून आवडणारे, महत्वाचे आणि जवळचे वाटणारे, असेच लोकं बोलावले. यावरून आमच्या घरच्यांना बरंच ऐकून घ्यावं लागेल याची आम्हाला जाणीव होती, पण लग्न आमचं असल्यामुळे आम्ही ठाम होतो.

मग वेळ आली बोलावाण्या करायची. मी आणि आमोघनं मिळून एक छान वेबसाइट तयार केली (www.amoghanvaya.wix.com/amoghanvaya). वेबसाइटचं सगळं डिज़ाइनिंग माझा एका मैत्रिणीनं आणि तिच्या टीमनं केलं. मी आणि आमोघनं मजकूर लिहिला. त्यात रेजिस्ट्रेशन फॉर्म टाकला, आणि दसरा-दिवाळी दरम्यान सगळ्या नातेवाईकांना पाठवायचा बेत आखला. वेबसाइट वेळेवर तयार झाली, आणि सगळ्यांना वेळेवर पाठवली/दाखवली गेली. जे म्हातारे/इंटरनेट न वापरणारे होते, त्यांच्यासाठी साध्या पत्रिका छापल्या होत्या. त्यांनाही त्या देण्यात आल्या.

वेबसाइटची कल्पना सगळ्यांना आवडली, खूप कौतुक ही झालं. पण त्यावर उत्तरं हवी तितक्या संख्येत आणि वेगात मिळेनात. काहींचं ठरत नव्हतं, काहींनी फॉर्मवर सगळी माहिती दिली नव्हती, आणि काहींचं चक्कं म्हणणं होतं की वेबसाइट वगैरे करण्यापेक्षा पत्रिकेची पद्धतच बरी होती. काहींना फॉर्मवरची माहिती (किती लोकं येणारेत, कसे येणारेत – आमच्या बसने की स्वतःच्या गाडीने, येणाऱ्या लोकांचे अंदाजे वय इत्यादी) कशासाठी हा प्रश्न पडलेला… मग आम्ही सगळं समजावून सांगायचो…तिथे कशी तयारी करावी लागणार आहे, तिथल्या सोयींची, राहण्याच्या ठिकाणाची किती क्षमता आहे, जेवण, नाश्ता यासाठी किती लवकर सांगावं लागणार आहे, हे सगळं सांगितलं की त्यातलं बर्याच अंशी त्यांना पटायचं.

तरी बऱ्याच लोकांनी पटापट हो किंवा नाही सांगितलं, आणि अगदी हातावर मोजण्याइतकी लोकं सोडली (ज्यातली बरीचशी शेवटी आलीच नाहीत) तर त्रास कोणाचाच नाही झाला. लग्नाच्या तब्बल 2 महिने आधी आमच्याकडे 90% यादी (दोन्ही बाजूंची) तयार होती. आकडा होता 157.

या सगळ्या खटपटीत मला आणि आमोघला कधी खूप मदत आणि सहकार्य तर कधी खूप मनस्ताप, असे दोन्हीही प्रकारचे अनुभव आले. आम्हाला अनेकांनी बजावलं होतं: भारतीय समाज अजुन ‘’ संस्कृती मधे रुळला नाहीये; वेबसाइट आणि त्यावर उत्तरं या फंदात न पडता सरळ नेहमीच्या वाटेने जा आणि डोक्याला ताप टाळा. काही क्षण असे आले की आम्हाला दोघांनाही वाटलं की खरंच, हे सगळं करायलाच नको होतं! पण या पद्धतीची सवय नसतानाही आम्हाला आमच्या पाहुण्यांकडून खरंच चांगलं सहकार्य मिळालं, आणि ते क्षण विसरून आम्ही मिळणाऱ्या प्रत्येक ‘हो’ मधे गुंतू लागलो.

आमचं लग्न छोटं होणार होतं, पण त्यात आम्हाला माहीत असणारी, आणि हवी असणारी लोकं येणार होती. आमच्या लग्नाचा त्यांनाही तितकाच आनंद होता, आणि त्याच्या हटकेपणाबद्दल उत्सुकता ही होती. आयुष्यातलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल आपल्या आवडत्या लोकांच्या साक्षीने उचलतोय, याचा आनंद किती साधा, सोपा, पण वेगळा होता…!

26 मार्च


Someone in the States had once asked me, “Why do you have so many guests at your weddings? Why are your weddings so lengthy and complicated?” The patriotic 17-year-old student in me had immediately answered: “Because back home, a wedding is not between two individuals; it is between two families.”

… 7 years later, this answer turned its tables on me.

Our declaration that ‘this is our wedding, so we will decide who attends it’ sounded perfectly sensible to us and equally perfectly inappropriate to our families. Of course, neither of us was against inviting close relatives. What we did not want was the extended crowd of strangers. To top it all, Anjarle was small, as well as really far. There, we could accommodate a maximum of 200 people. In such a situation, shouldn’t we give priority to those we knew and found to be important? This was the simple question Amogh and I asked.

Our families thought very differently about the whole thing. They had built and nurtured various relations for so long… it would be horrible to not invite them. Hadn’t they invited us for the weddings of their children? They had even presented us with gifts! How could we not invite them? Amogh and I were of the blunt opinion that if we would be in their place, we would be okay with not being invited to someone acquaintance’s child wedding. However, we knew that not everyone thought that way; rather, most people did not think that way.

The guest list was quite of a tug of war. Finally, the limitations of the venue rushed to our rescue, and we ended up including in our list only those we knew, liked, found important, and were close to. We were aware that our families would have to face a lot of heat over this decision, but it was our wedding, and we stood our ground.

Finally, it was time for invitations. Amogh and I created a lovely website (www.amoghanvaya.wix.com/amoghanvaya). A friend of mine and her team looked after all the designing. Amogh and I wrote the content. We added in a registration form, and decided to send it to all our relatives in around the time of Dasara and Diwali. The website was ready, and sent/showed to everyone on time. For the old members who did not use Internet, we printed simple patrikas which were then distributed as well.

Everyone loved the concept of the website, and there was a lot of praise showered on us. However, we couldn’t get RSVPs at the desired speed and in the desired numbers. Some just could not decide, some hadn’t filled the form completely, and some actually felt that patrikas served the purpose in a much better way than the website did. Some wondered why so much information (number of people, mode of transport – our bus or their car, age of attendees etc.) was needed… we would then explain the preparations, the capacity of the village and the venue, the information needed for preparing the meals, and then they would see light.

Still, I would say a majority was quick enough, and except for a handful of people (most of which simply didn’t turn up), nobody gave us trouble. We had 90% of the guest list (on both sides) ready two whole months in advance. The number was 157.

Through all this, Amogh and I experienced both, a lot of help and cooperation as well as a lot of frustration. A lot of people had warned us: the RSVP culture was still alien to the Indian society; best would be to chuck the website-RSVP route and go the traditional way to avoid unnecessary headaches. We had those moments when we genuinely wished we should have heeded that advice! However, despite not being used to RSVP-ing, our guests cooperated quite well with us, and we slowly forgot those moments of frustration as we lapped up every ‘yes’ we received in response.

Our wedding was going to be small, but we were going to be married among people we knew and whom we wanted to be there. They were equally happy about the wedding, and equally curious and excited about its offbeat nature. The joy of taking an important step in life with the cheers and blessings of our favourite people was so simple, sweet and unique…!

26 March

Advertisements

2 thoughts on “सप्तपदी – तिसरं पाऊल – बोलावण्या! The Seven Steps – Third Step – Invitations!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s