सप्तपदी – चौथं पाऊल – केल्याने होत आहे रे! The Seven Steps – Fourth Step – Doing gets it Done!

लग्नाची नवीन कल्पना सगळ्यांचा मनात रूजवली, बोलावण्या झाल्या. आणि आम्हा दोघांवर लग्न पार पाडायची जबाबदारी येऊन पडली. घरच्यांचं म्हणणं बरोबर होतं – आम्ही असा लग्न कधी पहिलं नाहीए, आणि तुमची कल्पना असल्यामुळे तुम्ही साकार करा!

तसं बघितलं तर आम्ही दोघांनीही अशी लग्नं पाहिली नव्हती. कोणाला विचारावं कळत नव्हतं. कामाच्या आवाक्याचा अंदाज येत नव्हता, पण तो मोठा असल्याचं जाणवत होतं. चुका होणार हे ही आतल्या आत जाणवत होतं. पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही म्हणून आम्ही एकदाची उडी मारली.

सगळ्यात महत्वाचा (आणि जिव्हाळ्याचा!) विषय म्हणजे जेवण! दर वेळी तेच तेच पनीर माखनवाला , दाल मखनी आणि जीरा राइस खाऊन आम्ही वैतागलो होतो. मराठी लग्नांत पंजाबी जेवणं अशा पद्धतीने वाढतात जणू काय मराठी माणसाला स्वतःची काही खाद्यसंस्कृतीच नाही! महाराष्ट्रात ‘बाहेरून’ येणार्यांबद्दल बोंबा मारायच्या, आणि आपण मात्र “संगीत” आणि “मटर पनीर” मध्ये धन्यता मानायची, हा दुटप्पीपणा मराठी समाजात हमखास चालतो. यालाच कंटाळून आम्ही दोघांनी महाराष्ट्रातल्या कोकणातलं अस्सल मराठी शाकाहारी जेवण ठेवायचा बेत रचला.

नाश्त्याला पोहे, साबूदाण्याची खिचडी, चहा (किंवा कॉफी) असे नेहमीचे पदार्थ ठेवले. दोन जेवणं होती – सीमांत पूजन आणि लग्न – आणि त्यात फ्लॉवर, बटाटा आणि आळूच्या भाज्या, मटकी आणि मुगाच्या उसळी, काकडी आणि टोमॅटोच्या कोशिंबीरी, पापड, लोणची, पोळ्या, भाकऱ्या, आमटी, वरण, भात, ताक, आणि सुंदर सोलकढी असे तत्सम पदार्थ ठेवले. गोड म्हणून आदल्या दिवशी खीर आणि दुसर्या दिवशी आम्रखंड-पुरी हे पदार्थ होते. त्याचबरोबर, माझ्या आईचा विशेष आग्रह आणि अमोघच्या आईचा दुजोरा यातून सगळयांचे लाडके उकडीचे मोदक सुद्धा लग्नाच्या जेवणाच्या ताटात अवतरले.

मी आणि अमोघ ने या बेताची फार तर फार 3 वेळा उजळणी केली असावी. दोघांना ही खाणं प्रचंड आवडत असल्यामुळे आमचे विचार आधीपासूनच स्पष्ट होते, आणि मतभेद पण झाले नाहीत. इथे वेळ वाचल्याचा आनंद झाला, पण तो पुढच्या कामांमध्ये कधी गमावला कळलंच नाही.

कपड्यांच्या कामात म्हणावा तितका वेळ गेला नाही. माझी बरीचशी खरेदी तर आईनेच केली. अमोघची खरेदी उशीरा, अगदी लाग्नाच्याच महिन्यात केली, पण ती एका दिवसात झाली. लग्नाची साडी (हो, साडी… साड्या नाही), माझी मीच पसंत केली, पण रंग मनात पक्के असल्यामुळे घड्याळी 5 मिनिटांत साडी घेऊन मी दुकानाच्या बाहेर पडले.

2 ठिकाणी मात्र ठिणग्या पडल्या. पहिली म्हणजे मला नसलेली ‘हौस’. ही सगळ्यांच्या दृष्टीने एक त्रासदायक गोष्ट होती. मला स्त्री-सुलभ हौशी कशा नाहीत हे मे पुष्कळ वर्ष ऐकलंय, पण आता त्याचा कळस होता. सीमांत पूजनला एक साडी आणि लग्नात ही एकच साडी नेसणार असं मी सांगितल्यावर काहूर माजला. साम दाम दंड भेद, सगळ्या प्रकारे मला समजावून झालं. कडाक्याची भांडणं तर झालीच. शेवटी शास्त्रांत 5-5 साड्या बदला असं काही सांगितलेलं नाहीए हे जेव्हा गुरूजींनी आम्हाला सांगितलं, तेव्हाहा सगळा प्रकार बंद झाला. आईने सीमांत पूजनाची साडी घेतली, आणि मी लग्नाची लाल-पिवळी नौवारी शिवून घेतली. साधारण सध्याच्या लग्नांमध्ये एका साडीवर जितका पैसा उधळतात, तितक्या किमतीत माझ्या दोन्ही साड्या अधिक घरच्यांच्या 1-2 साड्या आल्या. नौवारी शिवणाऱ्याने शेवटच्या क्षणी पदर छोटा करून घोळ घातला आणि तो काही केल्या चुक दुरुस्त करी ना, त्यामुळे तिथे पण एकदा तलवार काढावी लागली. शेवटी मात्र सगळं नीट झालं.

या आगीत तेल म्हणजे माझा दागिन्यांची संख्या आणि वजन कमी करण्यावर भर. मंगळसूत्र निवडायला मी आणि अमोघ गेलो तेव्हा दोघांनाही एक छोटं आणि नाजूक मंगळसूत्र आवडलं, आणि आम्ही तेच घ्येयचं ठरवलं. यावरून दोघांच्या घरच्यांना अतोनात दुखः झालं. मंगळसूत्र कायम घालता यावं या माझ्या उद्देशाकडे दुर्लक्ष करून, लग्नात ‘लोकांना दिसेल’ असा मोठं मंगळसूत्र हवं, नाहीतर ‘लोकं काय म्हणतील’ यावर काही वाद झाले. तरी शेवटी मला आणि अमोघला तेच आवडलं असल्यामुळे सगळ्यांचा नाइलाज होता.

ज्या मुलीला कपडे आणि दागिन्यांची हौस नाही, तिला आयुष्यात कशाचीच हौस नाही, मुळात, ती ‘हौशी’ नाही, हा अत्यंत चुकीचा आणि फालतू समज आपल्या समाजात इतका रुजलाय, की मला नाही वाटत तो पुढच्या 1-2 पिढ्यांत तरी उखडला जाईल. मुलीने लग्नात नटावं- मुरडावं आणि फार अक्कल वापरु नये या सर्वसाधारण मतावरूनच बायकांना आपल्या समाजात गोड बोलून किती खालचा दर्जा दिला आहे, आणि तो त्यांनी आनंदाने स्वीकारला आहे हे कळतं. ज्या मुलींना जी काही थोडीफार अक्कल आहे ती खरंच वापरावीशी वाटते, त्या विनोद किंवा निंदा- नालस्तीचा विषय ठरतात, आणि डोळ्यांना झापड लावलेल्या, पैसा, वेळ आणि विचार यांची कदर नसलेल्या मुलींना समाज “आदर्श मुली” म्हणून डोक्यावर बसवतो.

स्वतःची अक्कल गहाण ठेवणं हे सगळ्यात जास्त होतं ते रिती-रिवाज यांबद्दल. आमची पिढी शिकलेली, कित्येक जाणं परदेशी शिकून/काम करून आलेली. आमच्या लहानपणी इंटरनेट आणि तत्सम गोष्टींमुळे जग अक्षरशः घरात येउन बसलं. आम्ही पाश्चात्य चित्रपट, कपडे, जेवण, आणि सवयी पत्करल्या, पण त्यांच्याकडून एक साधी गोष्ट शिकलो नाही – स्वतः विचार करून कृती करणे. आम्ही अजुन गुरा- वासरांसारखं हाकलं जाण्यातंच धन्यता मानतो, आणि अशी धन्यता मानणाऱ्यांना उचलून धरतो. आपल्या लग्नात आपल्याकडून पढवल्या जाणाऱ्या मंत्रांचा अर्थ काय, हा विचार ‘पद्धत’शीर पणे मारला जातो.

त्यामुळे जेव्हा मी आणि अमोघ ने ठरवलं की लग्नातळे सगळे रिती-रिवाज आणि मंत्र समजावून घ्येयचे, आणि शास्त्र समजून लग्न करायचं, तेव्हा परत घरच्यांना धक्का बसला. गुरूजींवर विश्वास नाही! धर्माची कदर नाही! बर्याच जणांच्या मते आम्ही इथे मर्यादा ओलांडत होतो.

तरीही आम्ही आमचा मुद्दा सोडला नाही, आणि लग्नाचा एक-दीड महिन्या आधी आम्ही गुरूजींना दापोली ला भेटायला गेलो. सगळ्या कलकलाटात गुरुजी मात्र शांत होते. आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलीच, पण आम्ही हे सगळं विचारतोय याचं त्यांना मनापासून कौतुक वाटलं. मुलगी साड्या बदलण्यात आणि नटण्यात वेळ न घालवता मुहूर्त आणि पुजेला महत्त्व देत आहे याचं कौतुक अख्ख्या लग्नात फक्त गुरुजीना होतं. त्यांनी आम्हाला सगळ्या रिती व्यवस्थित समजावून सांगितल्या, शास्त्र काय आणि समाजाची पद्धत काय हे ही समजावलं, आणि शेवटी चक्कं त्यांचं मंत्रांचं पुस्तक आम्हाला वाचायला देऊन टाकलं. आम्ही त्यांचा आत्मविश्वास बघून एकाच वेळी आश्चर्यचकित झालो आणि सुखावलो. त्यांना त्यांच्या धर्माची आणि कामाची पूर्ण जाण होती, त्यामुळे त्यांना प्रश्नांबद्दल ना भीती होती ना राग होता. असे गुरुजी आम्हाला भेटले हे आमचं चांगलं नशीबंच म्हणावं लागेल.

हे सगळं चालू असताना पाहुणे उपस्थिती कळवत होते, आणि त्याप्रमाणे प्रवास आणि राहण्याच्या सोयीचं नियोजन होत होतं. पुण्यवरून 2 आणि मुंबई वरुन 1, अशा 3 बस ठरवण्यात आल्या. बसच्या बाबतीत तसं आम्हाला फारसं पहावं लागलं नाही; बरीचशी कामा घरच्यांनी केली. प्राथमिक चौकशी, बोलण्या, आणि व्यवस्थापन हे घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मिळून बघितलं. मे एकदा पुण्याच्या बस बघून आले आणि अमोघ ने मुंबईच्या बसच्या किंमतींची चौकशी केली, एवढंच.

मुक्काम व्यवस्थापन करताना मात्र मजा आली. किंबहुना लग्नात मला सगळ्यात काय आवडलं तर MS-Excel च्या स्प्रेडशीट्स वर पाहुण्यांच्या मुक्कामाचं नियोजन करणं. आम्ही हे काम एक महिन्याआधी सुरू केलं असलं तरी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही हे काम करत होतो; सीमांत पूजन ला 2-3 तास राहीले असताना मी आणि अमोघ खुर्च्या टाकून लॅपटॉप घेऊन अंजरल्याच्या रिज़ॉर्ट च्या पार्किंगमध्ये बसलो होतो! शेवटच्या क्षणी काही बदल झाले खरे, पण राहण्याच्या सोयीचा विचार व्यवस्थित करून ठेवल्यामुळे गोंधळ आणि त्रास दोन्ही कमी झाले. त्याचबरोबर आईने खोल्यांमध्ये लागणार्या वस्तूंची यादी आधीच करून ठेवल्यामुळे ते एक काम सोपं झालं.

तयारी जोरात चालू होती. एकीकडे आम्ही चुका करत होतो, कामं विसरत होतो, वाद घालत होतो, आणि दुसरीकडे कामं वेळच्या वेळी होत होती. हे सगळं ऑफीस, घर आणि मुंबईशी झगडताना! त्यात कामासाठी अमोघ दिल्ली आणि नागपूर ला जावून आला, मी कंबोडिया-लाओस-थाइलॅंड ला जावून आले, आम्ही जयपूर ला एका मित्राच्या लग्नाला जावून आलो, आणि आपापल्या नोकर्यांमध्ये 2-3 प्रॉजेक्ट्स पण पूर्ण केले. या सगळ्याचा मानसिक आणि शारीरिक ताण आला, पण आपण एवढं करतोय आणि करू शकतोय याचं समाधान होतं. आता वेध होते कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचे…!

मे २०१५


Wedding idea approved and invitations begun, we found ourselves vested with the responsibility of executing our own wedding. Our families were right: “we haven’t seen a wedding like this before; it is your idea, you execute it!”

But then, neither had any of us seen such weddings. We did not know who to ask. We couldn’t even begin to guess the scope of tasks looming over us, but we were quite aware that it was going to be huge. We also knew, at the back of our minds, that we were going to make a lot of mistakes. But no one ever learnt swimming without entering the waters, and we took the dive, once for all.

The most important (and favourite!) aspect of the wedding is the meal! We were sick of the repeated paneer makhanwala, daal makhni and jeera rice menus. Marathi weddings dish out Punjabi meals in a fashion which makes one wonder whether Marathi people have their own cuisine at all. The hypocrisy of crying hoarse over ‘outsiders’ coming to Maharashtra, and then gloating over “sangeet”s and “mutter paneer” in our weddings is unabashedly rampant in the Maharashtrian community. We were tired of this, and hence we decided to have a simple, vegetarian, Maharashtrian-Konkani  menu for the wedding.

We opted for the standard items, pohe,  sabudana khichadi and tea (or coffee), for breakfast. There were two major meals around the two programs – seemant poojan and the actual wedding – and they consisted of bhaajis of cauliflower, potato and colocasia leaves, pulses, cucumber and tomato salads (koshimbir), papads, pickles, chapatis, bhakris, aamti (Maharashtrian curry), varan (non-spiced Maharashtrian curry), rice, buttermilk, and delicious solkadhi. For dessert, we had kheer on the first day, and amrakhand-puri on the second. Moreover, as a result of my mother’s special wish, and Amogh’s mother’s support, the wedding lunch also had an extra dessert – the widely cherished ukadiche modak.

Amogh and I must have revised this menu a maximum of 3 times. Both of us being huge foodies, our thoughts over this were already in tandem, and we did not have to go back and forth at all. While we celebrated saving precious time here, little did we realize how other tasks were going to swallow it up.

To be fair, the shopping did not consume much time. My mother did most of my shopping for me. Amogh’s shopping was rather late, in the month of the wedding itself, but that took just one day. I selected my wedding saree (yes, saree… not sarees) myself, but since I had already decided upon the colours, it took me exactly 5 minutes to wrap up the whole thing.

There were two areas, however, where the sparks did fly. One of them was my non-existent “enthusiasm”. This was, according to all, a rather troublesome thing. I have been hearing about how I lack feminine choices and desires for a couple of years now, but this was the peak. Pandemonium reigned when I declared that I would wear only 1 saree for the seemant poojan and 1 saree for the wedding. Every possible technique was used to cajole me out of this idea. Heated arguments were inevitable. Finally, when the guruji told us that the shastras don’t have any provision of changing into half a dozen sarees, the debate was put to rest. My mother bought the saree for the seemant poojan, and I got my red-and-yellow nauwari stitched. On an average, the total cost of both of these sarees (throw in one more, or two) was equal to the cost of one saree purchased in a standard contemporary wedding. The tailor who stitched my nauwari screwed up the padar at the last minute, and when he would not correct it, I had to pull out my guns again. Finally, it all came out well.

Adding oil to the fire was my insistence on reducing the weight and number of jewellery on me. When Amogh and I went to select my mangalsutra, we liked a small, delicate one, and decided to finalize that. Our families were really disappointed to see our selection. Ignoring my point that I bought it with the intention of wearing it every day, most of the arguments centered on how a mangalsutra should be big enough for “people to be able to see it” on the wedding day. However, since both Amogh and I were firm on it, our families had little choice.

Our society has strongly judged and stereotyped girls whose desires and interests are not ruled by clothes and jewellery as girls who have absolutely no enthusiasm and interest in life. This extremely incorrect and frankly stupid notion is so entrenched in our society, that I do not see it being uprooted at least for the next 1-2 generations. The general idea that girls should simply dress up and look gorgeous and not bother using their brains in their wedding shows how society has sweet-talked women into accepting an inferior and insulting status, and how women have happily accepted it. Girls who wish to use whatever brains they have end up being a subject of either ridicule or criticism, and those who value neither time, money nor brains and prefer to walk blindly on the beaten path are lauded as the “good girls” by the society.

Chucking out sense and thought abounds in the case of rites and rituals. Our generation is educated, so many among us have studied abroad. Thanks to the Internet and its allies, the world was already in our homes when we were young. We happily embraced Western movies, clothes, food and habits, but we could not learn one simple thing from them – some original thought before action. We still find solace in being shepherded like cattle, and we cherish those who prefer the same as well. A simple thought – what is the meaning of all the stuff I am saying in my wedding rituals – is ‘ritualistically’ killed off.

That’s why when Amogh and I decided to actively seek out the meanings of the rites, rituals and mantras of the wedding, our families received another shock. Mistrust towards guruji! No respect for the religion! According to most, we were now really crossing the line.

We did not give up though. A month and a half before the wedding, we went to Dapoli to meet the guruji. Amidst all the chaos, the guruji was chilled out. He not only answered all our questions, but also genuinely appreciated the fact that we were asking them. In all of the wedding, the guruji was the only person who appreciated that the bride was giving more importance to the muhurta and the poojas than to changing sarees and continually fixing her make-up. He explained to us in detail all the rites and rituals, showed us the differences between what the shastras say and what the society follows, and in the end, simply gave us his book of mantras for further reading. His confidence surprised and gladdened us at the same time. He knew his religion and his work fully well, and hence our questions neither intimidated him nor enraged him. It is by sheer good luck that we met a guruji like him.

While all this was going on, the RSVPs were pouring in, and we were managing planning transport and accommodation simultaneously. We decided to hire 3 buses, 1 from Mumbai and 2 from Pune. We did not have to look much into transport; our families took care of it. Basic enquiry, negotiations and finalization, and management were all looked after by our families and relatives. All I did was check out the buses in Pune, and all Amogh did was enquire about transport costs from Mumbai.

What we quite enjoyed was accommodation management. In fact, my most favourite part of the whole wedding was allocating rooms to guests using MS Excel spreadsheets. Even though we started this work a month earlier, we ended up coming back to it right till the last minute; 2-3 hours before the seemant poojan, Amogh and I perched ourselves in the parking of the resort at Anjarle with our laptops! To be fair, there were changes at the last minute, but thanks to prior planning, there were considerably less incidences of trouble and confusion. Moreover, since my mother had already prepared a list of all the stuff that would go into the rooms and the task was simplified further.

Preparations were in full swing. On one hand, we were making mistakes, forgetting tasks, arguing, while on the other hand, deadlines were being met. All this while dealing with office, home, and Mumbai! Amidst all this, work took Amogh to Delhi and Nagpur, and me to Cambodia, Laos and Thailand. A trip to Jaipur for a friend’s wedding, and 2-3 projects at work were on our cards as well. All this stressed us out mentally as well as physically, but somewhere down the line, we were satisfied that we could do all this, and we were actually doing it. Now all we looked forward to was executing a smooth wedding…!

May 2015

Advertisements

2 thoughts on “सप्तपदी – चौथं पाऊल – केल्याने होत आहे रे! The Seven Steps – Fourth Step – Doing gets it Done!

  1. “महाराष्ट्रात ‘बाहेरून’ येणार्यांबद्दल बोंबा मारायच्या, आणि आपण मात्र “संगीत” आणि “मटर पनीर” मध्ये धन्यता मानायची, हा दुटप्पीपणा मराठी समाजात हमखास चालतो”

    मराठी लग्नामध्ये संगीत वगैरे प्रकार करणार्यांचा भयानक राग येतो. उगाच नको ते प्रकार आणि लग्नाचा बाजारीपणा…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s