सप्तपदी – पाचवं पाऊल – आपली माती, आपली माणसं! The Seven Steps – Fifth Step – Our Soil, Our People!

लग्नाची तारीख जशी जवळ जवळ येत गेली तसं सगळं वातावरण झपाट्यानं बदलत गेलं. एका बाजूला खूप उत्साह आणि उत्सुकता, तर दुसर्‍या बाजूला एकेक गोष्टींवरून खटके उडू लागले. कधी एकमेकांची समजूत घालून, कधी भांडून, तर कधी सोडून देऊन आम्ही एकेक वाद मिटवत होतो.

वादाला अपवाद कोणीच नव्हतं. अगदी मी आणि अमोघ सुद्धा. कित्येक वेळा मानसिक थकवा येयचा, काहीच सुचायचं नाही, अगदी सगळं सोडून पळून जावंसं वाटायचं. निरोप चुकीचे किंवा उशीरा दिले जायचे, किंवा दिलेच जायचे नाहीत. आम्ही भरपूर गोष्टी विसरलो, बर्‍याच गोष्टी पुढे ढकलल्या, आणि कित्येक प्रश्न तर डोक्यात आलेच नाहीत! या सगळ्यात दोघांच्या घरचे मागे लागले, ओरडले, आणि काही कामं करायला न सांगता पुढे सरसावले. आम्ही कितीही वाद घातले, तरी शेवटी आमच्या पाठीशी ठाम उभे राहिले.

माझं लग्न माझ्या आईनं लावून दिलं. आईचे विचार, आवडी-निवडी, तसे समाजाला धरूनंच. भारतीय समाजाबद्दल (माझ्यासारखा) सात्विक संताप तिच्या मनात नाही. तरीसुद्धा एक मात्र खरं –  माझ्यात जी स्वातंत्र्याची आणि सगळं स्वबळावर करायची जी ‘खाज’ आहे, ती तिच्या आयुष्याकडे आणि कर्तृत्वाकडे बघूनच आली आहे. त्यात भर घातली अमोघच्या आईने. त्या पण तशा समाजाच्या कलाने जगणार्‍या. पण पन्नाशीत आमच्या पिढीला लाजवेल इतकी जिद्द आणि कष्ट यांच्या जोरावर PhD करून त्यांनी माझ्यासमोर एक नवीन आदर्श ठेवला. या दोघी तर आहेतंच, पण लहानपनापासूनंच अगदी माझ्या पणजीसकट मी घरात आणि माझ्याभोवती कणखर, सहनशील आणि हुशार स्त्रिया पहिल्या. त्यांतील प्रत्येकीनं माझ्या व्यक्तिमत्वाला हातभार लावला. एकीकडे या सगळ्यांबद्दल मला आदर आणि आश्चर्य असा दोन्ही वाटतं, पण दुसरीकडे मला त्यांचं सहन करणं बघून त्रास पण होतो. इतकं सामर्थ्य असलेल्या बायकांना आपली पुरुष-प्रधान सामाजिक व्यवस्था इतकी चुकीची वागणूक कशी काय देऊ शकते हा मला नेहमी प्रश्न पडतो.

लग्नाच्या वेळी त्याहून मोठा प्रश्न मला पडला तो म्हणजे या सगळ्या बायकांनी ही वागणूक कशी काय मान्य केली! अर्थात, त्यांच्या मतांना, कारणांना आणि विचारांना मला आव्हान द्यायचं नाही. पण ती विचार-चौकट मला पत्करणं शक्य ही नाही. तिथेच मतभेद होऊ लागले – त्यांच्यासोबत नव्हे, तर एकंदर पूर्ण कुटुंबासोबतच.

पण खरं सांगायचं तर मतभेद घरच्यांसोबत नव्हते. खरा वाद आमचा समाजाशी होता. “लोकं काय म्हणतील” ही तत्सम भारतीय मनांची भीती इथे आमच्याशी लढत होती. नाहीतर इतकी वर्ष स्वतंत्र आणि प्रगतीशील विचार आणि साधेपणा शिकवणारे आणि जपणारे आमचे घरचे अचानक असे का बदलतील? आमचे विचार इतके दिवस मान्य असून, त्यांचं कौतुक सुद्धा करून, आता अचानक आम्हाला झापड लावून चालायला का सांगतील?

आता हे सगळं अगदी स्वाभाविक वाटतंय, पण ते प्रत्यक्ष घडत असताना मला आणि अमोघला काहीच सुधरत नव्हतं. आमची चिडचिड व्हायची, आम्ही गोंधळून जायचो; कित्येक वेळेला आम्हाला घरचे अनोळखीच वाटायचे. मग आम्ही दोघं वाद घालायचो. एकंदर सगळं अवघड होतं. या सगळ्यांत आश्चर्य म्हणजे माझे विचार सर्वांत जास्त पटायचे ते माझ्या आजी-आजोबांना. सगळ्यांत जुन्या पिढीचे ते असून त्यांचे आधुनिक विचार बघून मला खूप नवल वाटायचं.

पण शेवटी, आमचं काही पटो न पटो, आम्हाला सांभाळून घेतलं ते आमच्या घरच्यांनीच. त्यांची मतं बाजूला ठेवून त्यांनी आम्हाला आमचे निर्णय घेऊ दिले. चुका झाल्यावर रागावले, पण आमच्यावरचा विश्वास कायम ठेवला. त्यांच्या पिढीने मोठ्यांचं ऐकून लग्न केलेलं, आणि आता ते आम्हाला आमच्या मनाप्रमाणे लग्न करू देत होते. घरातल्या थोरल्या मंडळीच्या सावलीखाली वाढलेली पिढी पुढच्या पिढीला स्वतःच्या मतांप्रमाणे जगू देत होती. अशा पिढीला त्रास खूप होतो, पण त्यांच्यामुळे ते कुटुंब, आणि मग समाज, दोन्हींमध्ये अमुलाग्र आणि कायमचे बदल होतात.

लग्न आणि भावी आयुष्य याबद्दलच्या कल्पना जरी बर्‍याच अंशी माझ्या आणि अमोघच्या असल्या, तरी त्यांची मुळं आमच्या कुटुंबांमध्ये आहेत. आमच्या लोकांनी आम्हाला या विचारांची घट्ट मुळं दिली, त्यांना खात-पाणी आणि चांगली मातीही दिली, आणि ते साकार करायला पंख ही दिले. आपल्या मातीशी प्रामाणिक राहून स्वतंत्र विचार करणे, आणि नवीन जगाच्या तालाशी ताल जुळवून पुढे जाणे हे आम्ही घरीच शिकलो. ठिणग्या पडल्या, पण वाद कोणामध्ये होत नाहीत? कित्येकांना तर ती पण संधी मिळत नाही. आपले विचार बोलून दाखवणं हा आमच्यासाठी हक्क झाला; अजून खूप लोकांच्या दृष्टीने ते अहोभाग्यंच आहे.

खरंच, नशीबाचे आभार मानावे तितके कमीच!

मे २०१५


As time flew and the wedding date came closer, things started changing rapidly. On one hand, everyone was excited and eager about the wedding, but on the other, disputes about one thing or the other began cropping up. Sometimes we explained, sometimes cajoled, sometimes we fought, and sometimes we simply let things go.

No one was an exception to the friction. Not even Amogh and I. Frequently, we would be stressed, unable to think straight, simply wanting to drop everything and disappear. Messages would be delivered incorrectly, or late, or not at all. We forgot a lot, procrastinated even more, and did not even think of many things! Our families pushed us, scolded us, and quite a few times, took up some tasks all by themselves. No matter how much we argued, they stood by us like a rock.

My mother married me off. In a way, my mother’s values and choices are pretty much aligned with our society’s. She does not harbour much dissent against the Indian society (like I do). Yet one thing is true – my ‘itch’ for independence and struggle comes from observing her life and achievements. Adding fuel to the fire was Amogh’s mother. She too is someone who blends well with the Indian system. However, in her 50s, with a will and efforts that would make my generation blush, she pursued a PhD and set a whole new example for me. These two apart, since childhood, right from my great-grandmother, I have seen strong, resilient and intelligent women in my home and around me. Each of them contributed to my personality. On one hand, I feel both, respect and awe about them, but on the other hand, it troubles me to see them put up with so much. I always wonder how this patriarchal society can treat women with such potential so wrongly.

Yet, the wedding preparations posed an even bigger question in front of me – how do these women accept such treatment!? Of course, I do not mean to challenge their opinions, reasons and thoughts. But at the same time, I do not find it possible to accept this mindset. This is the point where the friction started – not just with them, but with the family as a whole.

But to tell you the truth, the friction was not with our families. The real conflict was with society. The fear of countless Indian minds – “what will people say” – was locked in a battle with us. Or else, why would our families, who for years taught and preserved values of independent and progressive thinking and simplicity, change so suddenly? After accepting and even lauding our thoughts for all these years, why would they tell us, one fine day, to do something blindly?

It all seems quite obvious now, but when it was all actually happening, neither Amogh nor I could make any sense of it. We would be annoyed and frustrated, confused, and many times, completely disillusioned by our family members. Then we used to argue. It was quite a tough situation. Amid all this, surprisingly, the people who approved of my approach the most were my grandparents. Despite being from the oldest generation, their modern mindset continually surprised me.

Finally, in the end, whether they agreed with us or not, it was the family which looked out for us. They kept their opinions aside, and allowed us to take our own decisions. They scolded us for our mistakes, but did not lose faith in us. Their generation married in tandem to their elders’ wishes, and now they were allowing us to marry as we wanted. A generation which was raised under a strong influence of the elders was freeing the next generation to live and grow on its own. Such a generation suffers, but due to them, the family, and then society, change drastically and forever.

Even though the ideas of and approach towards our wedding and marriage life are Amogh’s and mine, their roots are in our families. Our people gave us a solid grounding in these values, and they also gave us the wings to execute them. Both of us learned to think independently and take the world in our stride, while being deeply connected to our roots, at home. Sparks flew, but who does not face disagreements? So many among us do not even get a chance to disagree. Expressing our thoughts is a right for us, but even today, for many, it is sheer luxury.

We couldn’t be luckier!

May 2015

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s