सप्तपदी – सहावं पाऊल – शुभमंगल… The Seven Steps – Sixth Step – Shubhamangala…

लग्नाच्या बरोबर एक अठवड्याआधी मी बॅग भरली आणि मुंबईहून पुण्याला गेले. घरात जोरात तयारी चालू होती. कपडे, खाणं-पिणं, पाहुणे, विधी, अंजर्ल्यातली सोय… इतकी कामं होती की आता आठवायचं म्हटलं तरी थकवा येतो! त्यात माझी स्वीडनची मैत्रीण आली आणि तिच्या खरेदीची सोय करायची होती, जी सुदैवाने माझा जूनियर, सौमित्र जोशी, याच्या मदतीने झाली. अंजर्ल्यातली बरीच तयारी राहिलेली, म्हणून लग्नाच्या 2-3 दिवस आधी जावं लागणार होतं. हा सगळा ताळमेळ आम्ही कसा जुळवला ते आम्हालाच माहीत!

दोन दिवसांत मेहंदी, ग्रहमक, बॅगा भरणे, हेलेनची खरेदी आटोपणे, आणि तिला अंजर्ल्यापर्यंत घेऊन येणे, हे सगळं झालं. सुदैवाने ग्रहमक आणि मेहंदी-बांगड्या या कार्यक्रमांना वेळ लागला नाही. माझी हाता-पायाची मेहंदी 2 तासात झाली. जास्त काढलीच नाही! कार्यक्रमात आईनं युक्ती लढवली – घरी मिसळचा बेत ठेवला, आणि प्रत्येकाला बांगड्या आणि मेहंदीचा कोन असा सेट भेट म्हणून दिला. 2-3 तासात सगळं अवरलं गेलं.

तिथे अमोघकडे पण पटापट ग्रहमक आवरलं. खास आमच्या लग्नासाठी अमोघचा (आणि मग माझाही) जवळचा मित्र, प्रथमेश दातार, ऑस्ट्रेलिया वरुन आलेला. त्या मुलानं ग्रहमकापासून कामांचा जो सपाटा लावला, तो थेट लग्न पूर्ण संपल्यावरच तो निवांत बसला. पुण्याहून आम्ही- म्हणजे मी, आई आणि काका *- आणि डोंबिवलीवरुन अमोघ आणि दातार असे एकाच वेळी निघालो. आमची गाडी लहान असल्यामुळे हेलेनला मी शिवनेरी बस मधून पनवेल पर्यंत बसवून दिलं. पनवेलला अमोघ आणि दातारने तिला उतरवून घेतलं आणि मग अंजर्ल्यापर्यंत आणलं.

अंजर्ल्याला गेलो आणि त्या सगळ्या घाई-गडबडीत सुद्धा तो अथांग समुद्र बघून एकदम सगळे शांत आणि निवांत झालो. एक अख्खी संध्याकाळ समुद्राकाठी गप्पा मारण्यात घालवली. मग एकीकडे काहीजण दातारच्या लॅपटॉपवर राहण्याची व्यवस्था आखत असताना बाकीचे रिज़ॉर्टच्या खोल्या, जेवणाची तयारी, मंडप आणि साउंड सिस्टमची तयारी इत्यादी गोष्टी बघत होते.

दुसऱ्या दिवशी मी, अमोघ आणि दातार मोदकांची व्यवस्था बघायला शेजारच्या गावात गेलो. जाताना रम्य समुद्र किनारा, नारळाच्या आणि केळाच्या बागा, छोट्या छोट्या टुमदार वस्त्या बघून आम्ही तिघंही हरखुन गेलो होतो… दातार तर जास्तंच. येता-जाता शाळेतल्या आठवणींपासून भावी आयुष्यापर्यंत सगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या होत्या. आम्ही हे करत असताना आई आणि काका रिज़ॉर्टवर लागणार्या वस्तू आणत होते. हेलेन त्यांना मदत करत होती. युरोपच्या बर्फातून कोकणातल्या उन्हात ही मुलगी इतकी रुळून गेली, की हिला येऊन दोनच दिवस झालेत यावर कोणाचा विश्वास बसला नसता. कोकणातलं साधं भाजी-पोळीचं शाकाहारी जेवण तिने सहज खाल्लं. तिथे इंटरनेट, फोन आणि एसी शिवाय ती आरामात राहिली. या तिन्ही गोष्टींशिवाय एकही दिवस न राहू शकणारे आमच्या ओळखीचे काही जण आठवले आणि यावर हसावं की रडावं कळेना.

आम्ही सहा जणं वेगवेगळ्या कामात गुंतलेलो असताना तिथे अजुन दोन गाड्या आल्या – अमोघचे 2-3 मित्र, आणि माझ्या शाळेतल्या दोन सगळ्यात घट्ट मैत्रिणी, सायली आणि जिज्ञासा, आले! मग तर मजाच मजा. आम्ही सगळे भरपूर गोंधळ घालत कड्यावरच्या गणपतीला गेलो. भरपूर गप्पा, मस्ती, हसणं-खिदळणं आणि चिडवणं चालू होतं. लहान-मोठे, सगळेच आनंदात होते. दुसऱ्या बाजूला कामं पण पटापट होत होती. आमची मित्रमंडळी इतक्या उत्साहाने कामाला जुंपली की आमची काळजीच मिटली.

… सीमांत पूजनच्या अदल्या रात्री आम्ही सगळे समुद्राकाठी जेवत होतो. रिज़ॉर्टवरची कामं झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी, अमोघ आणि दातार मोदकांसाठी पैसे भरायला जाणार होतो, आई, काका, हेलेन आणि सायली शेवटचं खोल्यांना तपासणार होते, आणि जिज्ञासा आणि अमोघचे मित्र दापोलीला जावून हार, फुलं, पेढे इत्यादी शेवटच्या क्षणाची खरेदी करणार होते. त्या दरम्यान सकाळी पुणे आणि मुंबई वरुन गाड्या निघणार होत्या. लोकं दुपारी पोहोचतील, आराम करतील, आणि संध्याकाळी सीमांत पूजनला येतील, असं साधारण योजीलं होतं.

पण कितीही व्यवस्थित आयोजन करा… लग्न म्हटलं की…!

* सावत्र (खरंतर ‘सावत्र’ तसा अयोग्य शब्द) वडील. लग्नात माझे सख्खे वडील आले नाहीत.

जून २०१५


A week before the wedding, I packed my bag and left Mumbai for Pune. Preparations at home were in full swing. Clothes, food, guests, rituals, the arrangement at Anjarle… just thinking of it all exhausts me now! On top of it, I had a friend coming over from Sweden, and was supposed to take her shopping, but fortunately, my friend and junior Soumitra Joshi took care of that. A lot of work in Anjarle was yet to be done, so we had to go there 2-3 days before the wedding. How we ended up balancing all of this beats me!

In literally two days, we wrapped up the rituals of mehndi and grahamak (a pre-wedding ritual), packing, Helen’s shopping and getting her to Anjarle. Fortunately, grahamak and mehndi did not take much time. I was done with my mehndi, both hands and feet, in 2 hours. I hardly applied any! My mother devised a quick plan – we had a nice missal program at home, and each of the guests was gifted with a box of bangles and a mehndi cone. We were done with it in 2-3 hours.

At Amogh’s place too, the grahamak was wrapped up. Amogh’s (and then mine) close friend, Prathamesh Datar, had flew in all the way from Australia just for our wedding. That boy took up all the wedding tasks right from the grahamak, and did not rest until the wedding was over. My mother, uncle * and I left from Pune at the same time Amogh and Datar left from Dombivali, for Anjarle. Since we had a small car, I booked a seat on the Shivneri bus for Helen upto Panvel, where Amogh and Datar picked her up. They brought her to Anjarle with them.

The minute we reached Anjarle and saw the vast sea, our hurries and worries disappeared and we relaxed instantly. We spent a whole evening lazing about and chatting on the beach. Then, while some of us busied ourselves with the accommodation organization with the help of Datar’s laptop, the others started readying the rooms, following up with the menu, arranging for the mandap and the sound system etc.

The next day, Amogh, Datar and I visited the neighbouring village to oversee the preparations of the modaks. On the way, we were mesmerized by the sea, the coconut and banana plantations, and the small, neat settlements… Datar perhaps a bit more. During the journey, we chatted heartily about everything from school days to future plans. While we were gone, mother and uncle were buying stuff that would be needed for the weekend. Helen was helping them. The way she adapted to Konkan’s sunshine after stepping in from European snow would have convinced no one that she had arrived just two days ago. She easily adapted to Konkan’s simple, vegetarian poli-bhaji as well. She stayed in rural Anjarle sans Internet, phone and AC, reminding me, with mixed feelings, of certain people I knew who wouldn’t be able to survive a day without the three.

The six of us were occupied with various tasks when two more cars drove up – 2-3 of Amogh’s friends and my two besties from school, Saily and Jidnyasa, had arrived! Then it was fun all the way. A boisterous and noisy lot, we climbed up to the kadyawarcha ganpati. There was a lot of loud conversation, fun, laughter, and teasing all around. Old and young, all were enjoying. On the side, our task-lists were getting checked fast. Our friends took up all wedding tasks with so much enthusiasm that all our worries melted away completely.

…The night before the Seemant Poojan, we were all dining at the seashore. The tasks on the resort were done. Next morning, Amogh, Datar and I were going to pay the advance for the modaks. Helen, Saily, mother and uncle were going to do a final check of all the rooms and amenities, and Jidnyasa and Amogh’s friends were going drive down to Dapoli to buy flowers, garlands, pedhe, and other last minute stuff. At the same time, the buses from Pune and Mumbai were going to leave for Anjarle. According to our plan, the guests would reach by afternoon, take an afternoon nap and attend the Seemant Poojan in the evening, refreshed.

But no matter how well you plan… when it comes to a wedding…!

* Step (though the term ‘step’ feels wrong) father. My biological father did not attend the wedding.

June 2015

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s