पावसाळा

कधी धुक्याचे डोंगर, कधी वादळ, पाऊस, कधी जुन्या सवयीची त्याला नव्यानं हौस. कधी हळदीची बेटं विणते सावली हुशार, कधी सोसाट्याचा वारा, कधी टपोरे तुषार. कधी छत्रीचं मळभ, कधी अनवाणी पाऊल, कधी गोधडीचं प्रेम, गरम शिऱ्याची चाहूल. कधी रस्त्यांवरती नद्या, घरी गुडूप अंधार, पुढे धावणारी वीज, पाठीमागून मल्हार, कधी साक्षात तांडव, कधी हळूवार जिव्हाळा, दर वर्षी… Continue reading पावसाळा

सप्तपदी – सातवं पाऊल – … सावधान! The Seven Steps – Seventh Step – …Savadhaan!

२४ जानेवारी “अगं बाई, अजुन बस आलीच नाही!” सकाळी सकाळी या वाक्याने माझा डोळा उघडला. आई, अमोघ, दातार, हेलेन आणि काका जोरात चर्चा करत होते. मी सायली आणि जिज्ञासाला उठवलं आणि आम्ही बाहेर काय चाललंय ते बघायला आलो. पुणे-मुंबईत सगळा गोंधळ उडाला होता. मुंबईत आमच्या एका मित्राला बस सापडत नव्हती, आणि पुण्यात दोन्ही बस आल्याच… Continue reading सप्तपदी – सातवं पाऊल – … सावधान! The Seven Steps – Seventh Step – …Savadhaan!