सप्तपदी – सातवं पाऊल – … सावधान! The Seven Steps – Seventh Step – …Savadhaan!

२४ जानेवारी

“अगं बाई, अजुन बस आलीच नाही!”

सकाळी सकाळी या वाक्याने माझा डोळा उघडला. आई, अमोघ, दातार, हेलेन आणि काका जोरात चर्चा करत होते. मी सायली आणि जिज्ञासाला उठवलं आणि आम्ही बाहेर काय चाललंय ते बघायला आलो.

पुणे-मुंबईत सगळा गोंधळ उडाला होता. मुंबईत आमच्या एका मित्राला बस सापडत नव्हती, आणि पुण्यात दोन्ही बस आल्याच नव्हत्या! पुण्याहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी आम्ही गिरीकंद या नामांकित टूर कंपनीच्या २ बस आरक्षित केल्या होत्या. त्यांचा अगदीच वाईट अनुभव आला. दोन्ही बस जवळ जवळ पाऊण-एक तास उशीरा आल्या, आणि त्यातल्या एकीच्या खुर्च्या एकदम खराब निघाल्या. त्याच बस मध्ये बरीचशी वयस्क मंडळी होती. अशा वेळी आम्ही अंजर्ल्यावरून काय करणार? आम्ही तिथून गिरीकंदच्या ऒफिस ला फोन करत होतो, त्यांना घाई करत होतो. पण त्यापलीकडे आमच्या हातात काहीच नव्हतं. आई भयंकर काळजीत होती. मात्र आमच्या नातेवाईकांनी, खास करून माझे २ मामा आणि अमोघचा लांबचा भाऊ, यांनी सगळं सांभाळून घेतलं.

पुण्याच्या गाड्या निघाल्या, आणि तेवढ्यात मुंबईवरून मित्राचा फोन आला – त्याला बस मिळाली! आम्हाला हुश्श झालं. मग आम्ही सगळे आपापलं आवरायला गेलो. नाश्ता केला. सगळे उत्साहात होते – आज सीमांत पूजन! ठरल्याप्रमाणे गर्दी कामांसाठी पांगू लागली, आणि अमोघच्या बाबांचा फोन आला – तुमचा मित्र कोठे आहे? आम्ही त्याच्यासाठी थांबलेलो आहोत!

आम्ही सगळेच चक्रावलो. या मुलानं बस मिळाल्याचं कळवून अर्धा तास झाला होता. इथे तर ही मंडळी थांबली होती. मग हा गेला कोठे? परत फोन वर फोन. शेवटी कळलं की मुंबईची बस जिथे थांबलेली, तिथेच अजुन एक अशीच एका लग्नाची बस थांबलेली. साहेब त्या बस मध्ये चढले!

हे सगळं उघडकीस येईपर्यंत आमचा मित्र पनवेलला पोचला होता. त्याला तिथेच उतरवून घेतलं आणि मुंबईच्या मंडळीने शेवटी त्याला गाठलं. आमची हसून हसून पुरेवाट झाली.

तिथे गाड्या निघाल्या, आणि इथे आम्ही आमच्या कामांना निघालो. जिज्ञासा आणि अमोघचे मित्र दापोलीला गेले. मी, अमोघ आणि दातार शेजारच्या गावी मोदकांचे पैसे द्येयला गेलो. आई, हेलेन, सायली आणि काका रिज़ॉर्टवरचं सगळं सामान तपासून पाहात होते.

दुपार होऊन गेली तरी जिज्ञासा, अमोघचे मित्र, आणि पहूणे यातले कोणीच आले नव्हते, म्हणून आम्ही बाकीच्यांनी जेवून घेतलं. आम्ही तिन्ही बस मध्ये नाश्ता आणि दुपारचं जेवण ठेवलेलं होतं. येणाऱ्या लोकांचे अधून मधून फोन येत होते. त्यांची पण जेवणं झाली होती, आणि ते सुसाट निघाले होते. मात्र, मुंबईची बस पेण जवळ रहदारी मुळे तब्बल २ तास अडकून पडली. त्यात नुसते पाहूणे नसून नवऱ्यामुलाचे आई-वडील देखील होते. त्यामुळे आता सीमांत पूजन ला उशीर तर होणार होताच, पण एवढ्या दमून आलेल्या अमोघच्या आई-वडीलांना आराम करायला मिळणार नाही, याचीही सगळ्यांना काळजी होती.

दुसरीकडे आमची दापोलीला मित्र-मंडळी गायब. तिन्ही बस पण दापोली वरून येणार असल्यामुळे त्यांना बससाठी येताना रस्त्यात खूणा लावून येयला सांगितलं होतं. तर यांच्या आधीच पुण्याची लोकं पोचणार अशी चिन्हं दिसू लागली. मग दातार आणि सायलीने पटापट मुख्य इमारतीसमोर खुर्च्या टाकल्या, लॅपटॉप उघडलं आणि खोल्यांच्या चाव्या आणि पाहुण्यांची यादी घेऊन बसले.

पुण्याच्या दोन्ही गाड्या साधारण ४ वाजेपर्यंत आल्या. त्याच दरम्यान कोल्हापूर आणि इचलकरंजीची लोकं पण आली. त्यांच्या मागे मागे आमची दापोली ला गेलेली मित्रमंडळी. एकदम अंदाजे शंभर अनोळखी लोकं बघून दातार आणि सायली गांगरले, त्यामुळे मी आणि अमोघ खोली वाटप करायला बसलो. त्यात एक वेगळीच अडचण उदभावली. एवढ्या लोकांची पिण्याच्ं पाणी आमच्या गाडीत होतं, आणि चालक गायब झालेला. लोकं प्रवास करून थकलेली, त्यामुळे गोंधळ उडाला. आमचे मित्र चालकाला शोधायला पळाले. बऱ्याच वेळानं तो उगवला, पण तेव्हा आम्ही दोघं खोली वाटपात मग्न होतो त्यामुळे मित्रांनी आणि आईनं पाण्याचं सगळं ऐनवेळी व्यवस्थापन केलं.

एव्हाना आम्हाला कळून चुकलेलं की मुंबईच्या गाडीला खूपच वेळ लागणार होता. सीमांत पूजन थोडं पुढे ढकललं होतं, पण तरी थोडी काळजी होती. मी शक्य तितक्या वेळ बस साठी थांबले, पण शेवटी ५-५.३० ला माझं आवरायला गेले.

आईनं माझ्या इच्छेविरूध्द मेकअप साठी एका बाईंना नेमलं होतं. मी आवरायला गेले तेव्हा त्या पुढे सरसावल्या. मी त्यांना सांगितलं की मला भडक मेकअप मुळीच आवडत नाही. दोघींनी मिळून नक्की काय आणि किती मेकअप करायचं ते आधीच ठरवून घेतलं. मला साडी नेसून पूर्ण मेकअप करायला पाऊण तास लागला. आवरा-आवर चालू असताना हेलेन आणि जिज्ञासा मुंबईची बस आल्याचं सांगत आल्या.

अमोघचं आवरून झाल्यावर मला बाहेर बोलवलं. आम्हा दोघांचे सगळ्यांनी भरपूर फोटो काढले. कौतुक पण केलं. मुख्य इमारतीच्या अंगणात दुपारीच मंडप घातला होता, तिथे आता सगळे पाहूणे येऊन बसले होते. अमोघचे आई-वडील पण झपाट्यानं तयार होऊन पूजेच्या ठिकाणी हजर! इतका दमवणारा प्रवास करून सुध्दा दोघे एकदम व्यवस्थित आवरलेले, टवटवीत दिसत होते.

पूजा सुरू झाली. आमचे पटवर्धन गुरूजी आलेले. ठरल्याप्रमाणे त्यांनी सगळे मंत्र संस्कृत मध्ये म्हटल्यावर मराठीत समजावून सांगितले. मला आणि अमोघ ला त्यांनी विधी आधीच समजावल्या होत्या, आणि त्यांनी दिलेल्या पुस्तकात आम्ही ते मंत्र वाचले होते, त्यामुळे त्यांनी पटापट सांगितलं तरी आम्हाला ते कळत होतं. माझ्या मागे सायली, हेलेन आणि जिज्ञासा बसलेल्या. सायली मला मध्येच मागून “हस!” म्हणून टोचायची! पण मी आधीच खुश असल्यामुळे मला ते सांगायची गरज फारशी पडलीच नाही.

आधी माझी पूजा झाली, मग अमोघची. पूर्ण विधीत आम्ही देणं-घेणं ठेवलं नाही. अमोघचे पाय धुवायची वेळ जेव्हा आली तेव्हा त्याने फक्त पायाच्या अंगठ्यावर पाणी ओतून घेतलं. मी साडी बदलली नाही, आणि नंतर जो प्रत्येकाला वेगळा नमस्कार करायचा असतो तो आम्ही पूजेच्या ठिकाणावरूनंच ’सामुहिक’रित्या केला. उशीरा सुरू झालेलं सीमांत पूजन तासा-दीड तासात संपलं आणि ८ च्या सुमारास सगळे जेवायला गेले.

आम्ही जेवणाची वेगळी व्यवस्था केली नव्हती. तिथे समुद्रकाठी साधारण २०-२५ टेबलं आणि बाकं आहेत बसायला. समोर बुफे साठी मोठा ओटा. त्यात पुढे, अगदी किनाऱ्याला लागून आम्ही अजून एक २५-३० खुर्च्या टाकल्या. मात्र, आमचा अंदाज चुकला. अचानक सगळे जेवायला आल्यामुळे तिथे भली मोठी रांग तयार झाली. मग आमची मित्र मंडळी थांबली. त्यातले काही जणं आणि काही नातेवाईक, जसे की माझे १-२ मामा, ताटं भरून वयस्क लोकं आणि लहान मुलं यांना ती देत होती. मला आणि अमोघला काहीच काम पडलं नाही.

जेवण उत्तम होतं… म्हणजे मला तरी आवडलं. आम्हाला जी कोकणातली चव हवी होती ती जेवणात पुरेपूर उतरली होती. लोकं पण मजेत जेवत होती. सगळे समुद्रकाठी जेवण आणि खूप दिवसांनी, किंबहूना वर्षांनी भेटलेले नातलग यामुळे आनंदात होते. जेवणं पटापट उरकून सगळे समुद्रावर आतिषबाजी बघायला गेले. ही संकल्पना माझी किंवा अमोघची नव्हती, पण घरच्यांचा उत्साह बघून आम्ही विरोध केला नाही. आतिषबाजी खरोखरंच सुंदर होती. तिथल्या काळ्याभोर आकाशात आणि शांत पाण्यावर ती अधिकंच खुलून दिसत होती.

आतिषबाजी झाली, आणि सगळे परत मुख्य इमारतीच्या अंगणात आलो. तोपर्यंत माईक, स्पीकर्स आणि दातार तयार होते. मग काय, कार्यक्र्म सुरू! थकून भागून आलेले हौशी पाहूणे गाणी म्हणायला पुढे सरसावली. काका, त्यांचे मित्र, दातार, अमोघच्या आई, त्याचा मित्र श्रेयस, आणि त्याच्या मोठ्या मावस बहिणीने उत्कॄष्ट गाणी गायली. कार्यक्रम इतका रंगला, की “शोला जो भडके” हे गाणं गाऊ लागताच अमोघच्या एक आजी पुढे येऊन चक्क नाचू लागल्या! आम्ही सगळे चाट पडलो – समस्त तरूण मंडळीला जे करायची हिम्मत झाली नाही, ते त्या आजींनी बिंधास्त करून दाखवलं. मग काय, त्यांच्याकडे बघून आम्हीही चेकाळलो. मी, सायली, जिज्ञासा, अमोघ, दातार, हेलेन, माझी आणि अमोघची मैत्रीण मुग्धा आणि अमोघचा भाऊ रोहन आणि रोहनची बायको स्वाती, असे सुरुवातीला नाचायला आलो.

“शोला जो भडके” ला बर्फ चांगलाच वितळला! त्यानंतर जेव्हा सुवर्णा काकू “नवराई माझी” या सुप्रसिध्द गाण्यावर नाच करायला आली, तेव्हा खुद्द दातार तिला हात धरून पुढे घेऊन आला. आम्ही सगळे होतोच. आधे-मध्ये अमोघचे आणि माझे नातेवाईक आणि मित्र नाचायला पुढे येत होते. मी आणि अमोघ तर धमाल नाचत होतो. मी दातार आणि श्रेयस यांच्यासोबत नाचले, आणि अमोघ सायली सोबत नाचला – सगळ्या ज्येष्ठ मंडळींसमोर! एखाद्याला वाटेल इतकं काय नवल त्यात, पण जो मराठी लग्नांना गेलाय त्याला मराठी ब्राम्हण लग्नं किती गंभीर असतात हे माहिती आहे. सीमांत पुजन झाल्यावर नाच-गाणं, लग्न करणाऱ्या दांपत्यानं, खासकरून नवरी-मुलीनं असं तुफान नाचायचं नसतं, आणि होणाऱ्या नवऱ्याच्या मित्रांसोबत तर नाहीच नाही!

आम्ही दोघांनी मात्र ठाम ठरवलेलं – लग्न हा आनंदी सोहळा आहे, आणि त्यात भरपूर मजा, नाच-गाणं आणि हसणं-खिदळणं झालंच पाहिजे. आपल्याच लग्नात आपण मजा केली नाही तर काय उपयोग? कसलीही फिकीर न करता आम्ही सगळे रात्री सुमारे १ पर्यंत मनसोक्त नाचलो.

… शेवटचं गाण्ं संपलं आणि गर्दी पांगली. मी आणि आई आमच्या खोलीत झोपायला गेलो. अमोघ त्याच्या आई-वडीलांच्या खोलीत गेला. अख्खी संध्याकाळ चालू असलेला धुमाकूळ संपून कधी सगळीकडे शांतता पसरली, कळलंच नाही…

२५ जानेवारी

रात्रभर झोपच नाही. पहाटे ४ ला उठून हळद, अंघोळ, नऊवारी आणि मेकअप करून ७ च्या ठोक्याला मी मंडपात हजर… तर अख्खा मंडप मोकळा! १०.३४ चा मुहूर्त गाठायचा होता, आणि वैदिक पध्दतीचं लग्न असल्यामुळे ७-७.१५ ला विधी सुरू करणं भाग होतं. तर पाहुण्यांपासून गुरूजींपर्यंत सगळेच गायब! मी तिथे येऊन बसलेलं अमोघच्या मित्रानं आणि माझ्या एका मामानं पाहिलं, त्यांनी काही लोकांना उठवलं, आणि मग सगळे हळूहळू येऊ लागले.

गुरूजी ७.४५-८ च्या दरम्यान आले. तोपर्यंत घरातले सगळेच तयार होऊन मंडपात येऊन बसलेले. मुहूर्त गाठतोय की नाही शंका होती. लोकं मजेत समुद्राकाठी नाश्ता करत होती, त्यात आमच्या मित्र मंडळीनं पटापट खाऊन घेतलं आणि सगळे मदतीला आले. सायली, सोनल, जिज्ञासा विधींमध्ये काय हवं नको ते बघत होते. मुग्धा ने पटापट मंडप सजवला. सिड फोटो काढत होता. दातार आणि हेलेन मोदक आणायला गेले.

पूजा उशीरा सुरू झाली तरी गुरूजींनी जो तूफान वेग धरला, त्याला तोडच नव्हती. त्यात साड्या बदलणं आणि घेणं-देणं प्रकार नसल्यामुळे एका पाठोपाठ एक अशा पटापट सगळ्या पूजा आटोपल्या. १०.१५ ला अमोघ आणि त्याच्या घरचे व्याही भोजनाला गेले, १०.३० ला आम्हा दोघांमध्ये अंतरपाट आला, आणि बरोबर १०.३४ ला अंतरपाट खाली करून फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात आम्ही एकमेकांच्या गळ्यांत हार घातले. लग्न लागलं!

या सगळ्यात एकच खंत म्हणजे ऐन मुहूर्ताला दातार आणि हेलेन तिथे नव्हतेच. मोदक आणायला उशीर झाला; आणि आम्ही हार घातले आणि ते मंडपात पोहोचले. इतक्या लांबून आलेली हेलेन, आणि आमच्या लग्नात सगळ्यात जास्त कष्ट करणारा दातार, दोघेही मोक्याच्या वेळी तिथे असू शकले नाहीत याचं मला आणि अमोघला फार वाईट वाटलं. मुळात, पुर्ण लग्नात इतकी गडबड चालू होती, की कोण कोठे आहे याचा आम्हा दोघांना काहीच थांगपत्ता नव्हता, नाहीतर आम्ही त्यांना मुहूर्त चुकवू दिलाच नसता.

बाकी काही म्हणा, आपल्या संस्कारांमध्ये (योग्य आणि साध्या पध्दतीनं केल्यास) जे एक नितळ समाधान मिळतं ते नक्कीच अनुभवण्याजोगं असतं. मंगलाष्टकं, अंतरपाट, एकमेकांना हार घालणं, मंगळसुत्र… या सगळ्या गोष्टींचं आपल्या पिढीला कौतुक नसलं तरी तो संस्कार खरंच अविस्मर्णीय ठरतो.

… लग्न लागल्यानंतर एक-दोन विधी आटोपून सगळे जेवायला गेलो. जेवणात नेहमीच्या पदार्थांसोबत आळूची भाजी, आम्रखंड, मोदक, आणि सोलकढी हे विशेष पदार्थ होते. मी आणि अमोघ मोदक आणि आम्रखंड प्रत्येकाला आग्रह करून वाढत होतो, आणि त्यानिमित्तानं एकमेकांच्या नातेवाईकांच्या ओळखी करून देत होतो. समुद्राकाठी छान वाऱ्यावर बसून लोकांनी मस्त ताव मारला.

दुपारी जेवणं झाल्यावर पुणे-मुंबईच्या गाड्या निघाल्या. सायली आणि जिज्ञासा नाशिकला गेल्या; दातार आणि अमोघचे मित्र आपापल्या गाड्यांतून पुण्याला गेले. हेलेन मुंबईला एक दिवस फिरून मग यूरोपला परत जाणार होती. रिज़ॉर्टवर मी, अमोघ, आई, काका, आणि आजी-अजोबा, इतकीच लोकं राहिलो. सगळे गेल्यावर आम्हा दोघांना एकदम जाणवलं – आम्ही बेक्कार थकलो होतो! त्या सगळ्या गोंधळात नीट जेवलो पण नव्हतो. मग थोडंफार खाऊन आम्ही दोघं जे गाढ झोपलो, ते थेट संध्याकाळी सुर्यास्तानंतर उठलो.

…सकाळी पाहुण्यांची वर्दळ असलेला समुद्र किनारा एकदम निर्मनुष्य होता. सुर्याची शेवटची किरणं पाण्यावर तरंगत होती. एक वाऱ्याचा आवाज सोडला, तर सगळं किती शांत होतं. गेले १०-१२ महिने चालू असलेली धावपळ आणि काळजी, सगळा गोंधळ आणि ताण – सगळं नाहीसं झालेलं. खूप दिवसांनी हलकं आणि तृप्त वाटत होतं. मी आणि अमोघ एक ही शब्द न बोलता नुसते पाण्याकडे बघत चालत होतो. सगळं एकदाचं संपलं होतं…

पण ही तर सुरूवात होती.

ऑगस्ट २०१५


24 January

“Oh God, the bus hasn’t even arrived yet!”

I opened my eyes to this exclamation early morning. My mother, Amogh, Datar, Helen, and my Uncle were loudly discussing the absent buses. I shook Saily and Jidnyasa from their sleep and dragged them outside to see what was happening.

There was uproar back home, both in Pune as well as Mumbai. A friend in Mumbai could not find the bus, and in Pune, the buses simply didn’t show up! We had rented 2 buses from a very well-known tours and travels company named Girikand. However, they were enormously disappointing. Not only were the buses 45 minutes- 1 hour late, but also, the seats were torn in one. Unfortunately, the bus with the torn seats was also the one with a large number of elderly guests. In such a situation, what could we, stuck in Anjarle, do? We were hooked to the phone, continuously calling and hurrying the Girikand people, but beyond that, there was nothing more we could have done. My mother was worried sick, but our relatives, especially two of her cousin brothers, and one of Amogh’s cousin, managed it all.

As soon as the buses departed from Pune, our friend from Mumbai called – he had located the bus! We heaved a sigh of relief and went back to our rooms to get ready. Breakfast done, we were all enthusiastic – Seemant Poojan today! As we started drifting to our tasks, Amogh’s father called – where is your friend? We are waiting for him!

We were all flabbergasted. It had been half an hour since the boy had called us saying he had found the bus. Yet, the bus was waiting for him. Where did he go? Back to our phones again. Finally, we discovered that right next to where our bus was waiting was another bus, also departing for a wedding. Our friend boarded the other one!

By the time we unravelled the whole story, the boy had reached Panvel. We made him get down there and our Mumbai bus sped and finally caught up with him there. We laughed and laughed!

Buses on way, everyone back in Anjarle set about to complete their tasks. Jidnyasa and Amogh’s friends left for Dapoli. Amogh, Datar and I started towards the neighbouring village to pay for the modaks. My mother, uncle, Helen and Saily were looking after all the last minute arrangements at the resort.

Well into the afternoon, neither Jidnyasa and Amogh’s friends, nor any relatives appeared on the scene. The rest of us lunched. We had already arranged for meals on all the three buses. People on the bus were calling us now and then; they had had lunch too. However, the Mumbai bus was dead stuck in traffic for a whopping 2 hours near a town called Pen. The worrying part was that the passengers consisted of not only the guests, but also the groom’s parents. Hence, everyone was worried that the Seemant Poojan would get delayed considerably, and more importantly, that Amogh’s parents would come tired but would get no rest.

Meanwhile, our Dapoli-bound friends had vanished. All the buses were going to arrive via Dapoli, so we had sent them with arrow signs which they were supposed to put up on the roadside while coming back. However, it seemed that the Pune buses would arrive before these guys would. Then Datar and Saily quickly set up some chairs, a table, a laptop, the guest lists and the room keys in front of the main building, waiting for the guests to come.

It was about 4’o clock when the buses from Pune arrived. At the same time the guests from Kolhapur and Ichalkaranji also arrived. Tagging along were our friends returning from Dapoli. The sudden arrival of about a 100 people made Datar and Saily flounder, so Amogh and I got down to allocating the rooms ourselves. Among all this a new problem arose. The drinking water bottles were stashed in our car and the driver, who had the keys, was missing. This raised quite a pandemonium as people were tired and thirsty after a long journey. Our friends rushed to find the driver. The driver took a long time to appear; as Amogh and I were completely wrapped up in the room allocation business, my mother and our friends took care of the issue.

By now we had learnt that the bus from Mumbai was going to be terribly late. We had postponed the Seemant Poojan, but everyone was still worried. I waited for the bus as long as I could but then at around 5-5:30, I left to get ready.
Against my wishes, my mother had arranged for a beautician. She rose when I entered the room and I told her that I did not want any heavy make-up at all. We then decided upon how the make-up was to be, once for all. It took me 45 minutes to drape the saree and get all the make-up done. When I was getting ready, Helen and Jidnyasa dropped by to inform me of the arrival of the Mumbai bus.

 

I was called outside once Amogh was ready. After lots of pictures and compliments, we went towards the main building, where a mandap was set up. Amogh’s parents were already fresh, dressed and ready. Despite such a long and tiring journey, they were looking so neat and upbeat!

The pooja began. Our guruji was already there. As decided, he explained every Sanskrit verse in Marathi. He had already explained to us the rites and rituals, and both Amogh and I had gone through the book he had lent us. This made it easier for us to understand without asking him to slow down. Helen, Saily and Jidnyasa sat behind me. Saily kept poking me with a “smile!” now and then, but I was so happy that I needed no telling.

After rituals concerning me, it was Amogh’s turn. During the entire pooja, we completely cut out any exchange of gifts. One of the rituals consisted of the bride’s parents washing the groom’s feet. Strictly against such rituals, Amogh allowed them to only pour some water on his feet. Neither did I change sarees, nor did we go around taking blessings individually; we simply offered a collective ‘namaskar’ to everyone present from the mandap itself. A late Seemant Poojan was wrapped up in 1-1.5 hours and around 8 o’clock, everybody went for dinner.

There was no special arrangement for dinner. There were some 20-25 tables and benches, with a long counter for buffet right at the beach. We simply added another 25-30 chairs, thinking that would suffice. Our guess turned out to be totally wrong and there was a long queue in front of the buffet counter. Our friends decided to stay back. Some of our guests including a maternal uncle or two of mine were serving the children and the elderly. Amogh and I did not have to look after anything.

The food was excellent; or at least I loved it. The food brimmed with authentic Konkani taste, which we so wanted. People were enjoying the dinner as well. Dinner at the beach and reunion with relatives after a long time, probably years, made everyone happy. Everyone quickly wrapped up their dinner as there was a small fireworks display right at the waters. This idea was neither mine nor Amogh’s, but we did not have the heart to dampen our family’s enthusiasm. The fireworks were truly breathtaking. Against the backdrop of a calm sea and a pitch dark sky, they looked all the more stunning.

The fireworks done, everyone returned to the main building, where Datar had set up the sound system. Then, the show was on! Tired but enthusiastic guests came up for a musical night. My uncle, his friends, Datar, Amogh’s mother, his friend Shreyas and his elder cousin sang beautiful songs. The program took an impromptu turn when, on the tunes of “Shola jo Bhadke”, a popular old melody, an elderly aunt from Amogh’s side broke into a free spirited dance. We were all astounded- what none of us youngsters could bring ourselves to do, was easily done by her. She got us on our feet. Saily, Jidnyasa, Amogh, Datar, Helen, our friend Mugdha, Amogh’s cousin Rohan and his wife Swati, and I joined in.

“Shola jo Bhadkey” turned out to be a real ice breaker. After that when an aunt of mine came up to perform on the very famous “Navrai majhi”, Datar himself escorted her to the dance floor. We were already there. Our friends and relatives came to join us in between. Amogh and I were in full swing. I danced with Datar and Shreyas, while Amogh danced with Saily- all in front of our elders! One would wonder why this is such a big deal, but anyone who has attended a Marathi Brahmin wedding would know how serious these ceremonies are. Singing and dancing right after the Seemant Poojan, especially by the marrying couple, and moreover, by the bride with her husband’s friends is purely scandalous.

However Amogh and I had firmly decided- a wedding is supposed to be a happy ceremony, and it should be full of fun, music, dancing and laughter. What’s the point if one does not enjoy in his/her own wedding? Without a care, we danced till about 1 am into the night.

…The last song ended, and the crowd thinned. My mother and I left for our room; Amogh went to his parents’. Before we knew it, a busy and buzzing evening had turned calm and quiet.

25 January

We did not sleep all night. I woke up at 4 in the morning, and after the haldi, a bath, draping my nauvari and putting on my makeup, I was in the mandap at the stroke of 7… only to find it totally empty! The muhurta was at 10:34 am, and since it was a Vedic style wedding, it was extremely vital that we started the ceremony at 7-7:15 am. And yet, right from the guests to the guruji, there was nobody! Seeing me sitting there, a friend of Amogh and one of my relatives started waking people up, and slowly, the mandap started filling with guests.

The guruji arrived around 7:45-8:00 am. Till then, both the bride’s and groom’s families had arrived in the mandap. Everyone was anxious whether we would be able to have the main ritual i.e. exchange of garlands on the muhurta. While people were enjoying their breakfast on the beach, our friends gulped down theirs and came to help. Saily, Sonal, Jidnyasa were helping with the ceremony, Mugdha decorated the mandap, Sid took pictures, and Datar and Helen went to fetch the modaks.

Even though the pooja started late, the speed at which our guruji conducted it was unbeatable. Since we had cut any costume changes and exchange of gifts out of the picture, all the rites and rituals were completed in quick succession. At 10:15 am, Amogh and his family sat for the vyahi-bhojan, at 10:30 am, the antarpaat came up, and exactly at 10:34 am it fell and in the midst of a shower of petals, Amogh and I exchanged garlands. And we were married!

In all this, the only regret we had was that neither Datar nor Helen were present at the time of the muhurta. The delay in fetching modaks meant that Datar and Helen reached the mandap just in time to see us exchanging garlands. Amogh and I felt really sad that Helen, who had come from so far away, and Datar, who had put in so much effort, could not be there at the muhurta. Basically, we were so occupied with the ceremony that we had no idea about anybody’s whereabouts, otherwise we would not have let such a thing happen.

However I must confess that some of our rituals (when performed in a simple and appropriate manner) are really quite satisfying and worth experiencing. The mangalashtakas, antarpaat, exchange of garlands, mangalsutra… even if our generation does not think of them as a big deal, they are still an unforgettable experience.

… After the wedding and a ritual or two later, everybody went for lunch. The lunch consisted of, among regular items, a colocasia preparation, amrakhand, modak and solkadhi. Amogh and I enjoyed serving amrakhand and modaks to our guests, making introductions in the process. People feasted on their lunch at the beach.

Post lunch, the buses for Mumbai and Pune had to leave. Saily and Jidnyasa left for Nasik; Datar and Amogh’s friends drove away to Pune. Helen was to spend a day in Mumbai before flying back to Europe. It was just me, Amogh, my mother, uncle and grandparents on the resort now. After everyone left, Amogh and I realized- we were so tired! In the hullabaloo, we hadn’t even eaten properly. After a meal, we slept so soundly, that when we woke up in the evening, the sun had already set.

…The beach that was bustling with people that morning now was deserted. The last rays of the sun were floating on the waters. Except for the sound of the breeze, everything was so quiet. The rush, worries, frenzy, tensions of the past 10-12 months were simply gone. It was after a long time that we were feeling light and content at heart. Amogh and I were walking, gazing at the waters, wordlessly. Finally it was over…

But then, this was the beginning.

August 2015

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s