शाळा संस्कृती – विभाजनाची? A School Culture of Discrimination?

अमोघचं आणि माझं लग्न होऊन जेमतेम एक वर्ष झालं असल्यामुळे माझा तसा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांशी फारसा संबंध नाही. त्यामुळे आज जेव्हा माझी जाऊ गप्पा मारायला घरी आली, तेव्हा तिच्या मुलीच्या शाळेबद्दल ऐकून मला आणि अमोघला धक्काच बसला.

आम्ही ओक. जाऊ पण कोकणस्थ. ती मुंबईत मोठी झाली आणि मी नाशकात. अमोघ डोंबिवलीचा. म्हणजे तसं आम्ही तिघं ’बाहेर’चे, त्यामुळे पुण्याच्या “शाळा संस्कृती”चा तिघांनाही अनुभव नाही. जाऊची मुलगी ३ वर्षांची; या वर्षापासून शाळेत जाणार. मुलीसाठी शाळा बघण्याच्या प्रक्रियेत तिचं डोकं सुन्न झालं होतं.

शाळा शोधताना हल्ली पहिला धक्का बसतो तो शाळेच्या फिया बघून. मराठी मध्यमवर्ग एका दिव्य कचाट्यात सापडलाय. मुलांना चांगलं शिक्षण द्येयचा ध्यास, कॉर्पोरेशनच्या शाळांची दयनीय अवस्था, आणि खाजगी शाळांच्या न परवडणाऱ्या फिया यांचं सांगड कसं घालायचं? ती सांगत होती, कित्येक शाळांमध्ये आता मुलांचे इंटर्व्ह्यु घेत नसले तरी आई-वडील आय.टी. क्षेत्रात, किंवा भरपूर पैसा मिळवणारे आहेत ना? हे बघूनच प्रवेश दिला जातो. श्रीमंती आणि गरीबी यांच्यात दरी असते, आणि ती कमी करण्यापेक्षा कायम ठेवायची असते, हा धडा लहान मुलांना इथेच दिला जातो. मुलं मग आपल्याच आर्थिक स्तरांतील मुलांमध्ये मिसळतात, आणि समाजातील इतर घटक, त्यांची परिस्थिती, त्यांची स्वप्नं, आणि त्यांच्या समस्या समजण्यापासून ते वंचित राहतात. याला मुलांची प्रगती कसं काय म्हणणार?

त्यात कहर म्हणजे जात-धर्म-भाषेवरून भेदभाव. काही शाळांमध्ये फक्त उच्चभ्रू आणि शक्यतोवर मराठी ब्राम्हण मुला-मुलींना प्रवेश मिळतो. एकांनी चक्क सांगितलं – “या शाळेत फक्त कर्वे ते कुलकर्णीच येतात, तुमच्या मुलीला नक्की प्रवेश मिळेल.” लहान मुलाची जात कशी काय दिसते हो?! काही ठिकाणी प्रवेश अर्जावर धर्म आणि जात कमी पडतात की काय, म्हणून पोटजात पण विचारतात. जिथे कॉस्मोपॉलिटन वातावरण आहे, त्या शाळा सर्वसामान्यांना परवडत नाहीत, त्यामुळे शाळा निवडताना या गोष्टीला प्राधान्य दिलं जात नाही. त्यात “कशाला उगीच हिंदी-तमीळ लोकांमध्ये पाठवायचं? मराठी संगत असूदे!” हा विचार असतोच. जात आणि भाषेबद्दल इतका आग्रह असेल, तर धर्माबद्दल काय होत असेल हे सांगणे न लागे. यातून लहान मुला-मुलींना काय संदेश जातो? भारतासारख्या देशात, जिथे अनेक धर्म, जाती, भाषा एकत्र नांदत आहेत, तिथे “आपण वेगळे” (आणि कधी कधी सर्वांहून वरचढ सुद्धा!) हे मुलांच्या मनावर बिंबवून आपण भविष्यात काय साध्य करणार आहोत? आपल्या मुलांना वेगवेगळ्या धर्मांच्या, जातीच्या आणि भाषांच्या लोकांबरोबर मिळून मिसळून राहायची, मैत्री करायची आणि काम करायची शिकवण आपण जाणून-बुजून देत नाहीये का? ही मुलं कशी प्रगती करणार?

मी पुण्यात आले तेव्हा मला या सगळ्या प्रकरणाची पहिली झलक दिसली. फर्ग्युसन कॊलेज मध्ये पहिल्या दिवशी मला काही मुला-मुलींनी विचारलं – “तू देशस्थ की कोकणस्थ?” मी प्रश्न टाळला, कारण मला उत्तर माहितीच नव्हतं! आपण ब्राम्हण आहोत याचा उल्लेख घरी व्हायचा, आणि घरात तसं धार्मिक आणि हिंदुत्ववादी वातावरण असायचं, पण जात, आणि धर्म यांचा गवगवा कधी झाला नाही. मराठी हिंदू ब्राम्हण असण्याचा अभिमान बाळगून सुद्धा बाकीच्यांना तितकीच आदराची आणि प्रेमाची वागणूक देता येते, हे मी घरी शिकले. किंबहुना, समोरच्याचे धर्म/जात/भाषा आणि आपली त्याच्याशी वागणूक, यांचा शुन्य, आणि आला तर समोरच्याला चांगलं वाटेल, असाच संबंध जोडायला शिकले.

हे बाळकडू घेऊन मी पुण्यात आले, तर इथे भलतंच! १५-१६ वर्षांची मुलं, “तु ब्राम्हण, मी मराठा”, “मराठी गर्लफ्रेंड बघ रे, त्या सिंधी-पंजाबी पोरी नखरेल असतात, आणि साऊथच्या काळ्या असतात” (!!!), “तो कोकणस्थ असून इतर जातींत मिसळतो.” त्याचसोबत दुसऱ्या टोकाला ’बामनांना’ शिव्या, विद्यार्थ्यांच्या काव्य संमेलनात “बामनांना जाळून टाकेल असा सुर्य” वगैरे वाक्य, “दीज़ चीप महाराष्ट्रियन्स!” असे उदगार, आणि “हिंदू एक्स्ट्रीमिस्ट्स”च्या नावाने खडेफोड, हे सुद्धा अनुभवलं, आणि कोणाची साद आणि कोणाचा प्रतिसाद, काही कळेच ना. मराठी भाषेवर, ब्राम्हण समाजावर आणि हिंदू धर्मावर माझं मनापासून प्रेम असलं, तरी या भेदभावामुळे मला पुण्याची संस्कृती आणि लोकांविषयी अढी निर्माण झाली. आज शाळांचा हा दृष्टीकोन पाहिला, आणि मला त्या अनुभवांची पाळं-मुळं गवसल्यासारखं वाटलं.

हे कमी की काय, त्यात भर म्हणजे ज्या मुलांचे आजी-अजोबा किंवा आई (अर्थात बाबा नाही) ’फुल टाईम’ घरी आहेत, त्या मुलांना प्रवेश देण्यावर जास्त भर दिला जात आहे. मुलांचा अभ्यास वेळच्या वेळी घेतला जाईल, त्यांना वेगवेगळे प्रकल्प देता येतील, त्यांच्यावर ’चांगले संस्कार’ होतील आणि त्यामुळे शाळेत इतर मुलांना ’वाईट’ वळण लागणार नाही, ही त्या मागची कारणं. हे ऐकून मला हसूच आलं. कुठल्या जगात वावरतात या शाळा? आज टी.व्ही आणि इंटर्नेट मुलांच्या खोलीत आणि फोन मध्ये पोहोचलेत, हे त्यांना माहित नाही का? आणि मुलांचा अभ्यास व चांगले संस्कार ही जबाबदारी फक्त घरच्यांचीच आहे? अर्थात, लहानपणापासूनंच मुलांना भेदभाव शिकवणाऱ्या शाळा काय संस्कार करणार म्हणा! एकीकडे गलेलठ्ठ फिया पण भरायच्या, आणि किमान एका कमवत्या व्यक्तीनं घरी बसायचं, ही अपेक्षा धरणाऱ्या शाळांना महागाई आणि एकंदर आर्थिक व्यवस्था समजत नसावी बहुदा. आणि त्यात मुलांच्या प्रगतीला बांधून ठेवताना, यांना “आईचं महत्त्व” या गोंडस सबबी खाली स्त्रियांचं ही करियर थांबवायचं, यात काय थोर हेतू आहे कोण जाणे?

अर्थात, हे उघड उघड कोणी बोलत नाही. पण इतर जाती-धर्मांच्या लोकांना, आय.टी मध्ये किंव इतरत्र बक्कळ पगार न मिळवणाऱ्यांना, आणि आई-वडील दोघेही कष्ट करून कमावतात अशा कुटुंबांना ही झळ बसत आहे. ज्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांना प्रवेश मिळतो त्या एकतर कॉर्पोरेशनच्या तरी असतात (म्हणजे शिक्षणाच्या दर्जेची चिंता) किंवा अतिशय उच्चभ्रू, सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या असतात. ज्या शाळा त्यातल्या त्यात परवडतात, तिथे हे नखरे. सामान्य मुलांना चांगलं शिक्षण कसं मिळणार? की पुण्यात फक्त शुद्ध मराठी बोलणाऱ्या, श्रीमंत/उच्च मध्यमवर्गीय, ब्राम्हण मुलांनाच प्राधान्य मिळणार? अनेक शतकं कॉस्मोपॉलिटन असलेलं पुणं जात-धर्म-भाषा वरून विभागलं जात आहेच, ते मुलांमध्ये पण रुजवलं जात आहे.

shala

source: accordcoalition.org.uk

अशा सगळ्याच शाळा आहेत, आणि हे सगळ्यांचेच अनुभव आहेत हा माझा दावा नाही. पण अशी एक शाळा जरी असली, तरी ती समाज स्वास्थ्यासाठी घातक ठरू शकते. असं कुठेही, कुठल्याही भाषा/जात/धर्मासाठी होत असेल, तर त्याचा शोध घेतला पाहिजे आणि ते त्वरित थांबवलं पाहिजे. इतर धर्मांच्या लोकांच्या शाळा आहेत, तर हिंदूंच्या का नसाव्यात असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, पण त्याला उत्तर असं आहे की निश्चितंच असाव्यात. पण त्यांनी त्यांचा उद्देश ठोस मांडावा, आणि मग त्यात आर्थिक परिस्थिती, भाषा आणि जात आणू नये. अर्थात, हे फक्त मराठी आणि हिंदू शाळेंपुरतं मुळीच मर्यादित नाही. ’सर्वसमावेशक’चा बिल्ला छातीवर मिरवत या न त्या प्रकारे पैसा-जात-धर्म-लिंग-भाषेच्या आधारावर कोणीच भेदभाव करू नये, आणि मुलांमध्ये तो अजिबात रुजवू नये. RTE ची मुळ तत्वं पाळणं ही प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे, आणि या कायद्यातुन पळवाटा काढणं कितीही शक्य आणि सोपं असलं तरी ते करणं आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आणि आपल्या मुलांच्या वर्तमान आणि भविष्यासाठी घातक आहे.

…माझा जन्म पुण्याचा असला तरी मी मोठी झाले नाशकात. तिथे एका कॉन्व्हेंट शाळेत होते. शाळा फक्त नावाला कॉन्व्हेंट होती; आम्हाला शिकवणारे शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी समाजातील सर्व स्तरांतले होतो. कोठलाही वर्ग घ्या – प्रत्येक वर्गात मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मारवाडी, तमीळ, बंगाली, मल्याळी, सिंधी, कोकणी, कन्नड इ. मुलं होती. सर्व धर्मांतील, सर्व जातींतील, आणि सर्व आर्थिक स्तरांतील मुलं आणि शिक्षक रोज एकत्र असायची. कित्येकांचा मुळ समाज, जात किंवा आर्थिक परिस्थिती मला अजुनही माहित नाही, आणि त्यानं काही फरक पण पडत नाही. आम्ही एकत्र शिकलो, खेळलो, भांडलो, आणि मोठे झालो यात जास्त आनंद आहे. नाशिक हे पुणे-मुंबई इतकं नावाजलेलं शहर नसलं तरी तिथल्या कॉस्मोपॉलिटन शाळेत शिकल्याचा मला मनापासून आनंद वाटतो, आणि मी देवाचे आणि माझ्या नशीबाचे आभार मानते.


English Translation:

It’s been hardly a year since Amogh and I got married, so I do not have much access to school-going children and their parents. That is why, when my sister-in-law dropped by today and spoke of her daughter’s school, Amogh and I were shocked.

All three of us are Brahmins; they, Kokanastha, I, Deshastha. My sister-in-law grew up in Mumbai, I grew up in Nashik, and Amogh grew up in Dombivali, hence we are pretty much “outsiders” in Pune, with no experience of Pune’s ‘school culture’. My niece is 3 years old and would be attending school this year onwards. Her mother was stunned and frustrated at the whole school searching process.

Exorbitant school fees are the first rude shock young parents receive while searching for a school for their children. The Marathi middle class is trapped in an extremely tricky situation. On one hand, they aspire to give their children the best education; on the other, they have to put up with sky-rocketing school fees and terrible conditions of government schools. How does one reconcile all three? She was telling us, even though many schools do not interview children now, they do check if the parents are IT professionals and/or earning substantial incomes before letting the child in. This is where the children learn their first lesson of economic inequality: that there is a gap between the rich and the poor and rather than bridging it, it must be widened. These children, then, mix up with other children from their own social strata, and miss out big time on being exposed to other sections of the society, their conditions, dreams and problems. How can this be deemed as their progress?

On top of it, discrimination on the basis of caste and religion is rampant. Certain schools admit only highly privileged, Marathi Brahmin boys and girls. As one of them is audacious to put it this bluntly – “Only the Karves and Kulkarnis (both Brahmin surnames) attend this school; your daughter will be definitely admitted.” How on earth does one see a 3-year-old’s caste?! As if religion and caste are not enough, some schools also ask for the child’s sub-caste. Schools which have a cosmopolitan environment are unaffordable for the masses, and hence this parameter is rarely considered while searching for a school. Also, the attitude of avoiding “Hindi-Tamil folks” and sticking to “Marathi company” prevails. If language and caste are so fussed about, I need not mention the scenario regarding religion. What does this convey to the children? In a country like India, where a variety of religions, castes and languages cohabit, what are we going to achieve by hammering that we are ‘different’ (and sometimes, superior to all!) on young minds? Aren’t we depriving our children of the opportunity to live with, be friends with, and work with people from all religions, communities and backgrounds? How on earth will they succeed in life?

I first saw a glimpse of all this when I came to Pune for college. On my first day at Fergusson College, a few students asked me – “Are you Deshastha or Kokanastha?” I avoided the question, because I did not know the answer! My household used to buzz occasionally with remarks of us being Brahmins, and moreover, it was pretty religious and right wing Hindu, but caste and religion were never upheld with such frenzy. My family taught me that I could be proud of being a Marathi, Hindu and a Brahmin, and still treat everybody else with equal love and respect. Rather, I learnt that somebody’s religion/caste/language had, and should have, absolutely nothing to do with how I treated him, and if I ever established a connection, it should be a positive one.

It was with such lessons that I stepped in Pune, only to see something totally different. Mid-teens making comments such as “You are a Brahmin, I am a Maratha”, “Get a Marathi girlfriend; those Sindhi-Punjabi girls are sissies and the ones from the South are black” (!!!), “He mixes with everyone despite being a Kokanastha” stunned me. On the other side, I also experienced vulgar remarks on “Baaman”s (Marathi slang for Brahmins), verses such as “a sun that would burn all the Brahmins to death” at inter-college poetry festivals, exclamations of “these cheap Maharashtrians!” and vociferous insults of “Hindu fanatics”, and after a point of time, I could no longer distinguish actions from reactions. Despite my genuine love for Marathi language, Brahmin community, and the Hindu religion, such discrimination made me averse towards Pune’s culture and people. Today, on learning about such schools, I felt like I had grasped the roots of the problem.

As if this wasn’t enough, schools also check if the children have their grandparents or at least their mother (not their father, of course) at home full time before admitting them. The reasons behind this are that sufficient attention would be paid to the child’s studies, it would be easier to assign various projects (and get them done), they will be brought up ‘well’, thus not taking ‘bad influences’ to their classmates. I actually laughed at this. In what world do these schools function? Don’t they know that TV and Internet have penetrated into these children’s phones and bedrooms? And is a child’s education and good upbringing only the family’s responsibility? Of course, there is little such discriminatory schools can contribute to raising children, anyway. These schools, which expect parents to pay exorbitant fees and yet have at least one member of the family sit at home full time, apparently have no idea about current inflation rates and the overall conditions in the economy. And along with restricting children’s progress, they also want to restrict women’s careers under the sweet excuse of “a mother’s importance in raising children”. God only knows what noble cause this might help them achieve.

Of course, nobody speaks of this openly. But people from other castes and religions, those who aren’t into IT or other financially lucrative occupations and businesses, and young parents who work hard to put food on the table are suffering. Schools which accept diversity are either government schools (which means serious quality issues), or extremely high-profile, unaffordable to the masses. Schools which are affordable have such snobbish cultures. How will ordinary children obtain good education? Or would Pune schools prefer higher middle class/rich, Marathi speaking, Brahmin children over others? For centuries, Pune has already been divided over religious-casteist-linguistic lines, and it is being sowed into children’s minds as well.

I do not assert that this is the case with all schools, and that all people face such experiences. But if even one such school exists, it still has the potential to cause harm to the health of our society. If such discrimination is taking place in the favour of ANY community/caste/religion, then this should be brought to notice and stopped immediately. One might question: if other religions can be represented by schools, why shouldn’t Hinduism be? To which I would answer, yes, schools which wish to do so should definitely be allowed to do so. However, they should state it loud and clear, and then not discriminate further on the basis of financial status, language and caste. Nobody should be allowed to wear a mask of “all-inclusiveness” and pelt out discriminatory treatment on the lines of income-caste-religion-gender-language, and more importantly, not sow its seeds in young, formative minds. Every school is responsible for upholding the principles of RTE (Right to Education), and no matter how many loopholes one can find, doing so can be extremely harmful for us, our society, and for the present and future of our children.

… I was born in Pune, but I was brought up in Nasik. I attended a Convent school. The school was a Convent only in name; the teachers and students came from all strata of the society. Pick any classroom, and you would find Maharashtrians, UP-ites, Punjabis, Gujaratis, Marwadis, Tamilians, Bengalis, Malayalis, Sindhis, Kokanis, Kannadigas etc. sitting together. Children and teachers from all religions, castes, financial strata and communities came together every day. To this date, I do not know the exact community, caste and financial status of many, and it doesn’t matter. I am happy with the fact that we studied together, quarrelled and played together, and grew up together. Nasik is not a high-profile city like Mumbai or Pune, but I am glad that I studied in such a cosmopolitan school there, and I am thankful to God and my luck for that.

 

Advertisements

One thought on “शाळा संस्कृती – विभाजनाची? A School Culture of Discrimination?

  1. मलाही या प्रकाराची जाणीव २ महिन्यांपूर्वी भारतात गेलो होतो तेव्हा झाली. मी तर असे एक एक प्रसंग ऐकलेयत की एकूणच प्रकाराने हबकून गेलोय.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s