भास

निळ्या आभाळाचा आरसा त्यात तुझा मज भास वादळाच्या काळजाला इंद्रधनु ची आरास पावसाची पहिली सर जणू तुझीच चाहूल पाहा, थेंब ही विचारी तुझ्याबद्दल नभास काळी माती तुझी सखी माझी भरून ओंजळ माझ्या श्वासात फुलवते तुझा मोहक सुवास गार वाऱ्याची झुळूक तुझ्या स्पर्शाचं साैंदर्य चोरपावलांनी येते मनामध्ये तुझी आस – ऑक्टोबर २०१८

धावपळीतला संवाद

पाठीमागे शंभर कामं, बोलायला वेळ नाही, डोक्यात शंभर गोष्टींचा कशाशीच ताळमेळ नाही! धकाधकीत ही ५–१० मिनिटं, श्वासाला एक हाक. शब्दांच्या गर्दीत मनाला शहाणपणाचा धाक. “बोलायचं राहिलंय का काही?” हा तर रोजचाच प्रश्न. “नाही” म्हणण्यात समावलंय खूप राहिलेलं असणं. ऊन–सावली विणत येईल संवादाची संधी; होतील का बंदिस्त शब्द नव्याने स्वच्छंदी? – गौरी नूलकर ऑक्टोबर २०१८

आज अनेक दिवसांनी

तू बोललास थोडं थोडकं, किती शब्द तसेच उरले! तरीही मी ओळखलं, तुला शब्द नाही पुरले. मी विसरून गेले होते तुझ्या डोळ्यांची ती भाषा जिच्या प्रतिभेनं माझे डोळे आपसुकंच भरले. आज अनेक दिवसांनी तू मला स्वतःहूनच भेटलास अन् पुन्हा मनामध्ये माझ्या खोलवर जाऊन बसलास. मी विसरून गेले होते तुझी दरवळणारी जादू ती आठवण पुन्हा जागी करून… Continue reading आज अनेक दिवसांनी

Questions

How long do we not acknowledge the vagaries of youth? How long do we just close our eyes to blinding lights of truth? To what extent we hide our fears, how tight we seal our lips? How much do we prefer to lie, than being labelled uncouth? Just how do we locate the line that… Continue reading Questions